भूपेश बघेल यांच्या मुलाच्या घरावर ईडीचा छापा ; तीन वाहनांमधून पोहोचले अधिकारी, बघेल यांचे खोचक ट्विट

Bhupesh Baghel ED raid। दारू घोटाळा आणि आर्थिक अनियमिततेच्या चौकशीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज सकाळी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे पुत्र चैतन्य बघेल यांच्या भिलाई त्याठिकाणच्या निवासस्थानी छापा टाकला. सकाळी साडेसहाच्या सुमारास ईडीचे पथक तीन वाहनांमधून घटनास्थळी पोहोचले आणि सीआरपीएफ सुरक्षेत घराची झडती सुरू केली.
समोर आलेल्या माहितीनुसार, दारू घोटाळा आणि त्यासंबंधित आर्थिक अनियमिततेच्या चौकशीअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. सध्या, तपास सुरू असून अधिकाऱ्यांकडून कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.
ED आ गई.
आज विधानसभा सत्र का अंतिम दिन है.
अडानी के लिए तमनार में काटे जा रहे पेड़ों का मुद्दा आज उठना था.
भिलाई निवास में “साहेब” ने ED भेज दी है.
(कार्यालय- भूपेश बघेल)
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) July 18, 2025
भुपेश बघेल घरी हजर Bhupesh Baghel ED raid।
महादेव बेटिंग घोटाळ्यातील ‘लाभार्थीं’पैकी एक भूपेश बघेल आहे, असे सीबीआयने एफआयआरमध्ये म्हटले आहे.
छत्तीसगड विधानसभेचा आज शेवटचा दिवस असताना ही कारवाई झाली आहे. माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल आज विधानसभेत रायगड जिल्ह्यातील वृक्षतोडीचा मुद्दा उपस्थित करणार होते. पर्यावरणीय परिणामांबाबत त्यांनी अलीकडेच गावकऱ्यांची भेट घेतली. विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान ते सहसा रायपूरमध्ये राहत असले तरी, यावेळी ते भिलाईमध्ये उपस्थित होते – जिथे ईडीचे पथक पोहोचले होते.
दारू घोटाळ्यात आतापर्यंत काय घडले? Bhupesh Baghel ED raid।
७ जुलै रोजी, आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) दारू घोटाळ्यातील चौथे पुरवणी आरोपपत्र दाखल केले, ज्यामुळे घोटाळ्याची अंदाजे रक्कम २,१६१ कोटी रुपयांवरून ३,२०० कोटी रुपये झाली. हे आरोपपत्र ३० जून रोजी दाखल करण्यात आले.
या प्रकरणात आतापर्यंत एकूण पाच आरोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत, त्यापैकी तीन आधी दाखल करण्यात आली होती. या घोटाळ्यात २९ उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना (जिल्हा अधिकारी, सहाय्यक आयुक्त, उपायुक्त) आरोपी करण्यात आले आहे, ज्यात काही निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे.





