मुंबई – वर्ष २०१५ मध्ये ‘दम लगा के हैशा’ चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर झळकलेली अभिनेत्री भूमी पेडणेकर सर्वांच्या परिचयाची आहे. कमी वयातही देसी स्टाईल भूमिका साकारून भूमीने अभिनय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पदार्पणानंतर भूमी फार वेळा मोठ्या स्क्रिनवर झळकली नाही. पडद्यावर जरी देसी लूक भूमीचा असला तरी खऱ्या आयुष्यात ती खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस राहते.
भूमी आपला ३३ वा जन्मदिवस साजरा करत आहे. यानिमित्त आपण तिच्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. आयुष्मान खुराणासोबत फिल्मी करिअरला सुरुवात करून भूमीला आज जवळजवळ सात वर्ष पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नसताना देखील भूमीने सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
भूमी पेडणेकरची एकूण संपत्ती किती?
भूमी पेडणेकरच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, तिची एकूण संपत्ती 2 मिलियन आहे. भारतीय चलनानुसार पाहिली तर भूमी पेडणेकरची एकूण संपत्ती १५ कोटी रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार भूमी पेडणेकर ही 15 कोटींची मालकीण आहे. ही मालमत्ता तिने स्वतःच्या मेहनतीने मिळवली आहे. त्याच वेळी, अभिनेत्रीचे मासिक उत्पन्न देखील आश्चर्यकारक आहे. भूमी एका महिन्यात 25 लाखांहून अधिक कमावते.
भूमी पेडणेकर एका वर्षात 3 कोटी रुपये कमावते
18 जुलै 1989 रोजी मुंबईत जन्मलेली भूमी पेडणेकर एका वर्षात 3 कोटींहून अधिक रुपये कमावते. एवढ्या कमी कालावधीत भूमी ही अशी अभिनेत्री असेल जिने स्वतःची वेगळी ओळख तर निर्माण केलीच शिवाय एक चांगले एम्पायर देखील उभे केले आहे. जुहू येथील आर्य विद्या मंदिरातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर भूमीने तिचे सर्व लक्ष अभिनयावर केंद्रित केले होते.