‘दलदल’मध्ये भूमी पेडणेकर दिसणार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत

बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणकर तिच्या आगामी ‘दलदल’ या वेबसिरीजमध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. भूमी पेडणेकरने नुकतेच याबाबत सांगितले आहे. लवकरच ‘दलदल’ या वेब सीरिजमधून पहिल्यांदाच ती पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसणार आहे.
भूमीने या वेब सिरीजबाबत सांगितले, ‘दलदल’ हा एक स्त्री असण्याच्या सर्व गुणांचा समावेश असलेला प्रकल्प आहे. रीटा ही एक सुपर ॲच्युअर, काचेची छत तोडणारी आणि पुरुषाच्या जगात नियम पुन्हा लिहिणारी स्त्री आहे. मी अशा महिलांना आदर्श मानते आणि प्राइम व्हिडिओसारख्या जागतिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर ही मालिका रिलीज होणार आहे, या सिरीजमधून मला जगाला भारतीय महिलांची शक्ती आणि सामर्थ्य दाखवण्याची संधी मिळेल.’
‘दलदल’ या वेबसिरीजमधील भूमिका खूप आव्हानात्मक असून माझ्यासाठी हा एक नवीन प्रकारही आहे. यामध्ये एक्शनला भरपूर वाव आहे. रीटा फरेरा या माझ्या भूमिकेला अनेक पदर आहेत. ती बाह्य आणि अंतर्गत मतांच्या फरकांमध्ये अडकली आहे. माझे पात्र मुंबईचे डीसीपी म्हणून तिचे काम सुरू करते आणि ती अनेक खून आणि इतर गुन्ह्यांची उकल करते. भूमी पेडणेकरची ‘दलदल’ ही वेबसिरीज ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसारित होणार आहे.
दरम्यान, भूमी पेडणेकरने २०१५ मध्ये ‘दम लगा के हईशा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती आयुष्मान खुरानासोबत दिसली होती. या चित्रपटात भूमीने एका महिलेची भूमिका साकारली होती. या पात्राला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली.





