भूमी पेडणेकरने घेतली पापाराझींची ‘शाळा’

मुंबई – अभिनेत्री भूमी पेडणेकरबद्दल असे क्वचितच पाहायला मिळते की ती कोणावर तरी रागावते किंवा मीडियासमोर असे काही करते जे चाहत्यांना बघायला आवड नाही. पण यावेळी समोर आलेला व्हिडिओ खूपच वेगळा आहे आणि यामध्ये ती पापाराझींची शाळा घेतांना दिसत आहे.
सोशल मीडियावर सध्या तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. भूमीचे फोटो क्लिक व्हावे किंवा व्हिडिओ काढावा असं तिला वाटत नव्हतं. व्हिडिओमध्ये, तिचा फोटो क्लिक होऊ नये म्हणून भूमी पटकन मागे पळते. यानंतर भूमी पेडणेकर तिथे येते आणि पापाराझींना फोटो काढू नका असे सांगतात. जेव्हा पापाराझी कॅमेरे बंद करत नाहीत तेव्हा ती रागाने तिच्या कारमध्ये जाते. यावेळी भूमी पापाराझींची शाळा घेतांना दिसत आहे. हा व्हिडीओ चर्चेत असून लोक त्यावर चर्चाही करत आहेत.
भूमीने हे का केले याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. आता यूजर संमिश्र प्रतिक्रिया देतांना दिसत आहे. काही युजर्सने तिची बाजू घेतली आहे तर काही युजर्सने तिला घमंडी म्हटले आहे.
दरम्यान, भूमी पेडणेकरने तिच्या वेगवेगळ्या भूमिका आणि उत्तम अभिनयाने इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘दम लगा के हईशा’ या चित्रपटात वजनदार मुलीची भूमिका साकारून तिने इंडस्ट्रीत पदार्पण केले. यानंतर भूमीने अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. भूमी लवकरच ‘द लेडीकिलर’ या चित्रपटात अर्जुन कपूरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.





