भूमी पेडणेकर घेते आहे आरोग्यासाठी फायदेशीर ‘हीलिंग थैरेपी’

मुंबई – वर्ष २०१५ मध्ये ‘दम लगा के हैशा’ चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर झळकलेली अभिनेत्री भूमी पेडणेकर सर्वांच्या परिचयाची आहे. कमी वयातही देसी स्टाईल भूमिका साकारून भूमीने अभिनय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पडद्यावर जरी देसी लूक भूमीचा असला तरी खऱ्या आयुष्यात ती खूपच स्टायलिश आणि ग्लॅमरस राहते.
भूमीचे फिटनेस व्हिडिओ व्हिडिओ सोशलवर नेहमीच व्हायरल होत असतात एकदम लठ्ठ ते एकदम फिट अस ट्रांसफॉर्मेशन नेहमीच चर्चेत असते. नुकतंच भूमी पेडणेकरचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती एका मैत्रिणीसोबत उपचार करताना दिसत आहे. भूमीने स्वतः तिच्या इंस्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
या भूमी हीलिंग थैरेपी घेत आहे, सध्या हीलिंग थेरपी खूप लोकप्रिय होत आहेत. एनर्जी हीलिंग ही एक पारंपारिक थेरपी आहे जी तुमचे मन, शरीर आणि आत्म्यामध्ये ऊर्जा प्रवाह राखण्यावर आणि मन-शरीराला शांत करण्यावर लक्ष केंद्रित करते. हे शरीराच्या सर्व पैलूंचे संतुलन साधून मानसिक, शारीरिक, भावनिक आणि मानसिक फायदे प्रदान करते. या व्हिडिओत भूमी आरोग्यासाठी फायदेशीर अशी हीलिंग थैरेपी घेतांना दिसत आहे.
दरम्यान भूमी पेडणेकर आणि यश कटारिया यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यश आणि भूमी दोघेही अनेकदा एकत्र दिसल्यामुळे त्यांच्यात अफेअर असल्याच्याही चर्चा रंगल्या आहे. भूमीच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास, नुकतीच ती सुधीर मिश्रा यांच्या ‘अफवाह’मध्ये दिसली होती. यापूर्वी ती ‘भिड’ आणि ‘गोविंदा नाम मेरा’मध्ये दिसली होती. अर्जुन कपूरसोबत तिचा ‘द लेडी किलर’ आहे. त्याच्याकडे रोमँटिक कॉमेडी ‘मेरी पटना का’ चा रिमेक देखील आहे, ज्यात अर्जुन आणि रकुल प्रीत सिंग यांची भूमिका आहे. ती ‘भक्त’मध्येही दिसणार आहे.





