भोसरी, (वार्ताहर) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रामदास आठवले) पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांच्या नेतृत्वाखाली भोसरी विधानसभा आढावा बैठक पार पडली. महायुतीचे सदस्य असलेल्या आरपीआयने आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला विजय मिळवून देण्याचा निर्धार केला. आमदार महेश लांडगे, आरपीआयच्या राज्य महिला अध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे, राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब भागवत, वाहतूक आघाडीचे अजीज शेख, इला ठोसर , सम्राट जकाते, सिकंदर सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. भोसरी विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये आमदार महेश लांडगे यांना तिसऱ्यांदा विधानसभेमध्ये पाठवून त्यांची हॅट्रिक करण्याचा निर्धार व्यक्त केला. कामगार नेते विनोद चांदमारे, कार्याध्यक्ष राजू उबाळे, सरचिटणीस बाबा सरोदे, कामगार आघाडी अध्यक्ष दुर्गाप्पा देवकर, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष सुजित कांबळे, बापू गायकवाड , पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा रुक्मिणी पाटील, अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष शहादा पठाण, कार्याध्यक्ष योगेश भोसले, संघटक संदीप तोरणे, सुनील पवार, राघू बनसोडे, शाखाध्यक्ष प्रतिमा ओव्हाळ, सविता मस्के, सरचिटणीस रत्नमाला सावंत, प्रतिभा ठोंबरे, बाबुराव जोगदंड, भगवान आढाव, अनिरुद्ध कुरणे, अनिल ढाले, प्रसिद्ध प्रमुखअनिल तांगडे आदी उपस्िथत होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल माघाडे यांनी विशेष प्रयत्न केले.