भोसरी एमआयडीसीतील सेंच्युरी एंका कंपनीला भिषण आग

आठ अग्रिशमन बंबाव्दारे आग विझविण्याचे प्रयत्न

पिंपरी : भोसरी एमआडीसी येथील सेंच्युरी एंका कंपनीमध्ये आज मंगळवार दि. 21 मे रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भिषण आग लागली. या अगिमध्ये कंपनीचे मोठे नुकसान झाल्याची माहीती समोर येत आहे. सध्या अग्निशमन दलाच्या आठ गाड्यांच्या माध्यमातून ही आग विझवण्याचे अटोकाट प्रयत्न अगिशमन दलाचे जवान करीत आहेत.

भोसरी येथील एमआडीसी मध्ये असणाऱ्या सेंच्युरी एंका या कंपनीला आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भिषण आग लागली. आगीची माहीती समजताच पिंपरी येथील अग्निशमन दलाची गाडी लागलीच घटनास्थळी दाखल झाली. मात्र, आगीने भिषण स्वरुप घेतले असल्याने तातडीने या ठिकाणी वल्लभनगर अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या, भोसरी, प्राधिकरण, तळवडे येथील अग्निशमन विभागाच्या प्रत्येकी एक गाडी, तसेच बजाज कंपनी आणि हिंजवडी एमआयडीसी अग्निशमन दलाची गाड्याही आग विझवण्यासाठी मागवण्यात आल्या आहेत. सध्या या ठिकाणी आठ गाड्यांच्या माध्यमातून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

दुपारी एक वाजेपर्यंत ही आग आटोक्‍यात आणण्याचा अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करीत होते. सध्या काही प्रमाणा आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, या आगीमध्ये कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे .

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.