Bhosari Accident : भरधाव पल्सरने पादचाऱ्याला उडवले; ४४ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
Bhosari Accident ; आकुर्डीतील २२ वर्षीय दुचाकीस्वाराविरुद्ध एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; वेगाने वाहन चालवणे बेतले जीवावर.
Updated On:

Bhosari Accident – रस्ता ओलांडणाऱ्या एका अनोळखी पादचाऱ्याला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. २३ जानेवारी) रोजी सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास भोसरी एम.आय.डी.सी. येथील टेल्को रोडवर अंडरपास संपणाऱ्या ठिकाणी घडली.या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल भारत मुऱ्हे यांनी शनिवारी (दि. २४) रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दुचाकी चालक आदित्य अनंत नाईक नवरे (वय २२, रा. वाल्हेकरवाडी रोड, आकुर्डी) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदित्य हा त्याच्या ताब्यातील बजाज पल्सर दुचाकी (एमएच14 एमएम 3467) वेगाने आणि वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून चालवत होता.
यावेळी रस्ता ओलांडणाऱ्या एका ४४ वर्षीय अनोळखी व्यक्तीला त्याने जोरदार धडक दिली. या अपघातात संबंधित व्यक्ती गंभीर जखमी होऊन तिचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.





