पुणे जिल्हा | भोरचे ग्रामदैवत श्री जानाईदेवीची यात्रा उत्साहात

भोर (प्रतिनिधी) – भोरचे ग्रामदैवत श्री जानाईदेवीची यात्रा व रामनवमीनिमित्त कुस्त्यांचा आखाड्यात महाराष्ट्र केसरी पैलवानांसह राज्यातील २७० नामांकित पैलवानांनी हजेरी लावली. एक हजारापासून ५ लाखांपर्यतचे बक्षीस बुलेट, दुचाकी गाडी, म्हैस, सोन्याची अंगठी इनाम म्हणून देण्यात आले.
जानाई देवी यात्रा व रामनवमी निमित्ताने सरकारी बागेत जंगी कुस्ती आखाड्याचे आयोजन जानाईदेवी याञा उत्सव समितीचे अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी समितीचे सदस्य विजय ढवळे, आप्पा दळवी, गणेश कांबळे, राजेंद्र भेलके, सचिन तारु, दत्तात्रय भेलके, गुलाब किवळे, गणेश पवार, अमित सुर्वे, पप्पू सागळे, अक्षय सागळे, कृष्णा तामकर, आण्णा बांदल, तेजस घोडके,
संजय चोरघे, सुरज ओसवाल, तुषार भोकरे, राजेश गिरे, अभि भेलके, तोसिफ आतार, जावेद शेख,सोमेश्वर खोपडे, बाळा शेटे, गोटु शेटे, मयुर भेलके, मयुर येलगुडे यांनी योग्य नियोजन केले. प्रथम क्रमांकाची कुस्तीसाठी आमदार संग्राम थोपटे यांच्या वतीने ५ लाख इनाम विक्रम सिंग विरुध्द महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांच्यात होती. मात्र, शेख यांना दुखापत झाल्याने कुस्ती अनिर्णयित राहिल्याने इनाम वाटून दिले.
दुसरा क्रमांक पृथ्वीराज थोपटे यांच्याकडून बुलेट इनाम होते. माऊली कोकाटे व महेंद्र गायकवाड यांच्यात कुस्ती अनिर्णयित राहिल्याने बक्षीस विभागून दिले. तृतीय क्रमांकाचे बक्षीस विक्रम चव्हाण यांच्या वतीने अडीच लाख इनाम होते. प्रकाश बनकर – गणेश जगताप यांच्यात लढत झाली. मात्र, निर्णय झाला नाही, इनाम वाटप केले.
चौथी कुस्ती रामचंद्र आवारे यांच्या वतीने अडीच लाख व म्हैस इनाम, वेताळ शेळके यांने विलास डोईफोडे याला चितपट करुन इनाम जिंकले. पाचवी कुस्ती सचिन हर्णसकर व गणेश पवार यांच्या वतीने अडीच लाख व हिरोहोंडा गाडीचे इनाम, पृथ्वीराज मोहोळ याने हसन पटेलवर विजय मिळवत जिंकले.
सहावी कुस्ती डाॅ. इम्रान खान यांच्या वतीने अडीच लाख बालारफिक शेखने भारत मदणेला चितपट करून इनाम जिंकले. तर सातवी रमेश ओसवाल यांच्या वतीने दोन लाख इनाम असलेली कुस्ती माऊली जमदाडेने राकेशकुमारवर विजय मिळवला.
तुषार वरखडेला सोन्याची अंगठी
तर दत्तात्रय चोरमले,स्वप्नील पवार यांच्या वतीने सोन्याची अंगठी व एक लाख रुपये तुषार वरखडे याने सोन्या सोनटक्के याला चितपट करत जिंकले. याशिवाय माजी नगरसेवक संजय जगताप,गणेश कुंभार,विलास कुंभार,मंगेश शिंदे,रघुनाथ किरवे,धनंजय वाडकर,पोपट सुके संभाजी सातव,सुहास खांदवे,राजेंद्र कटके,योगेश,सातव शिवाजी बुचडे यांच्या वतीने इनाम ठेवण्यात आली होती. दरम्यान कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांनी मोठी गर्दी केली होती.





