खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांना न्यूड व्हिडिओ कॉल; तरुणीने केला ब्लॅकमेलचा प्रयत्न

भोपाळ – खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना रविवारी रात्री एका मुलीचा व्हिडिओ कॉल आला, ज्यामध्ये ती मुलगी नग्न अवस्थेत दिसली. यानंतर रविवारी सायंकाळी दोन अनोळखी क्रमांकावरून अश्लील फोटो आणि मेसेज पाठवण्यात आले. या प्रकारानंतर पोलिसांनी अज्ञात फोन नंबरवर एफआयआर नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
रविवारी खासदाराच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून फोटो आणि मेसेज आले. यावर प्रज्ञासिंह यांनी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास टीटी नगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. मोबाईल क्रमांकावरून आलेल्या आक्षेपार्ह संदेशावरून पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.
टीटी नगर पोलिस अधिकारी सिंग रघुवंशी यांनी सांगितले की, अज्ञात फोन नंबर विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, खासदारांना यापूर्वीही अश्लील फोटो पाठवण्यात आले आहेत. मोबाईल क्रमांक शोधण्यासाठी सायबर सेलची मदत घेतली जात आहे. लवकरच आरोपी पकडले जातील.
प्रज्ञा ठाकूर यांना करोना पॉझिटिव्ह असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना 5 फेब्रुवारी रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्या दोन दिवसांपासून घरीच आराम करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना रविवारी संध्याकाळी 7 वाजता व्हॉट्सअॅपवर एका तरुणीचा व्हिडिओ कॉल आला. काही वेळाने मुलीने तिचे कपडे काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर लगेचच खासदारांनी फोन कट केला. हा व्हिडिओ कॉल मोबाईल क्रमांक 6371 608 664 वरून आला होता. त्यानंतर काही वेळातच त्या मुलीचा रेकॉर्डिंग व्हिडिओ दुसरा क्रमांक 82807 74239 वरून पाठवण्यात आला. यासोबतच आरोपींनी मागणी मान्य न केल्यास खासदाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून खासदार साध्वी यांनी तत्काळ टीटी नगर पोलीस ठाण्यात माहिती दिली. खासदाराच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम 354, 507 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल केला.





