Irshalgad Trekking : दुर्दैवी घटना..! ट्रेकिंगला गेलेल्या भिवंडीच्या तरुणाचा इर्शाळगडावर मृत्यू; नेमकं काय घडलं?
Irshalgad Trekking : रायगडमधील इर्शाळगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या २६ वर्षीय आकाश वाघमोडे या तरुणाचा दरीत कोसळून मृत्यू झाला.

Irshalgad Trekking : रायगड जिल्ह्यातील खालापुर तालुक्यातील इर्शाळ गडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकाचा दरीत पडून मृत्यू झाला आहे. या 26 वर्षीय तरुणाचा गडाच्या पायथ्याला मृतदेह आढळून आला.
इर्शाळवाडी येथील ही दुर्घटना असून, भिवंडी येथील आकाश वाघमोडे (वय 26) हा तरुण काल रविवारी इर्शाळगडावर सोलो ट्रेकिंगसाठी गेला होता. मात्र, एकटाच ट्रेकींगसाठी आला असता तो दरीत कोसळल्याने दुर्दैवी घटना घडली. (Irshalgad Trekking)
आकाशची मोटरसायकल गडाच्या पायथ्याशी सापडली आहे. खालापुर पोलिस आणि खोपोली येथील हेल्प फाऊंडेशन यांनी सोमवारी शोधकार्य सुरु केले असता, आकाशचा दरीत कोसळून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी संबंधित घटनेचा पंचनामा केला असून त्याच्या कुटुंबीयांना माहिती दिली आहे. (Irshalgad Trekking)





