Bhiwandi Fire News : भिवंडीमध्ये आगीची मोठी घटना घडल्याचे समोर आले आहे. सरवली एमआयडीसी परिसरातील डायपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली. आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाचे जवान सध्या आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. मात्र, आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. भिवंडी तालुक्यात सरवली एमआयडीची परिसरात सदाशिव हायजिन प्रा.ली ही डायपर बनवण्याची कंपनी असल्याची माहिती आहे. दरम्यान, मंगळवारी पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास कंपनीला अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण करत संपूर्ण कंपनीला विळखा घातला. सुदैवाने कंपनीतील कर्मचारी वेळीच बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली. आग इतकी भीषण होती, की परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. पाण्याच्या कमतरतेमुळे आग विझवण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. आग नेमकी कशामुळे लागले याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.