भिर्रर्रर्रर्र….! शब्द पाळला, अमोल कोल्हेंनी बैलगाडा शर्यतीपुढं बारी धरली…

Updated On:
भिर्रर्रर्रर्र….! शब्द पाळला, अमोल कोल्हेंनी बैलगाडा शर्यतीपुढं बारी धरली…

पुणे – शिरूर लोकसभा मतदार संघ हा बैलगाडा शर्यतीच्या राजकारणावर गेल्या अनेक वर्षांपासून अवलंबून असलेला पाहायला मिळतो. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी याच राजकारणावर गेल्या तीनही लोकसभा निवडणुका जिंकून इतिहास घडविला. मात्र तोच इतिहास डॉ. अमोल कोल्हे यांनी मोडीत काढला. शिरूर लोकसभा मतदार संघावर डॉ. कोल्हेंच्या रूपाने राष्ट्रवादीला खासदार मिळाला.

याच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान डॉ. कोल्हे यांनी मतदारांना आश्वासन दिले होते की, “ज्या दिवशी बैलगाडा शर्यत सुरू होईल त्या दिवशी हा तुमचा पठ्ठ्या पहिल्या बारी म्होरं घोडी धरणार म्हणजे धरणार..”. त्यानिमित्ताने आज (१६ फेब्रुवारी) निमगाव दावडी येथील खंडोबा यात्रेच्या निमित्ताने बैलगाडा घाटात शर्यतीची बारी भरवण्यात आली होती.

एकूण 350 बैलगाडा मालक सहभागी झाले होते. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वतः दावडी निमगावच्या घाटात घोडी धरत मतदारांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. इतकच नव्हे तर बैलगाडा शर्यतीवरुन शिरून मतदार संघातून विरोधक शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील यांच्या आव्हानालाही चोख उत्तर दिले आहे. यावेळी बैलगाडा शर्यतीला सुरुवात झाल्यानंतर एकच जल्लोष घाटावर पाहिला मिळाला. आणि याच जल्लोषात अमोल कोल्हेंनीही आपली घोडेस्वारीची कौशल्य दाखव दोन्ही हात सोडून बारी मारली

आणखी संबंधित बातम्या

Navratri Festival 2026 : श्री महालक्ष्मी मंदिराचा सार्वजनिक नवरात्रोत्सव 11 ऑक्टोबरपासून

2026-10-06 18:54:29

Navratri Festival 2026 : श्री महालक्ष्मी मंदिराचा सार्वजनिक नवरात्रोत्सव 11 ऑक्टोबरपासून

Pratap Sarnaik : अमराठी चालकांनी मराठी भाषा अभियानात सहभागी व्हावे; मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

2026-10-06 17:29:48

Pratap Sarnaik : अमराठी चालकांनी मराठी भाषा अभियानात सहभागी व्हावे; मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये कधी जमा होणार? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

2026-10-06 11:55:05

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये कधी जमा होणार? आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

Chandrashekhar Bawankule : "दुष्काळी परिस्थिती गंभीर, कोरोना महामारीपेक्षाही हे मोठे संकट असल्याने उत्सवांवर..."; बावनकुळेंचे आवाहन

2026-10-06 09:38:41

Chandrashekhar Bawankule : "दुष्काळी परिस्थिती गंभीर, कोरोना महामारीपेक्षाही हे मोठे संकट असल्याने उत्सवांवर..."; बावनकुळेंचे आवाहन

Pune Water Cut: पुणेकरांनो १५ ऑक्टोबरपासून पाणी कपात होणार? महापालिका प्रशासनाची मोठी अपडेट समोर

2026-10-06 07:00:30

Pune Water Cut: पुणेकरांनो १५ ऑक्टोबरपासून पाणी कपात होणार? महापालिका प्रशासनाची मोठी अपडेट समोर