चंद्रशेखर आझाद एम्समध्ये दाखल

नवी दिल्ली ; सुधारीत नागरीकत्व कायद्याच्या विरोधात केलेल्या निदर्शनात सहभागी होऊन हिंसाचार घडवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना न्यायालयाच्या आदेशानुसार एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या रक्ततातील लाल पेशींचे प्रमाण खूप वाढले आहे. पॉलिथिमिया या आजाराने ते ग्रस्त आहेत.
एम्समधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आझाद यांच्यावर हेमॅटॉलॉजी विभागात अनेक दिवसांपासून उपचार सुरू आहेत. त्यांना उपचारासाठी आणण्यात आले. त्यांच्या चाचण्या घेण्यात येत असून त्या नंतर त्यांना परत पाठवण्यात येईल.
आझाद यांच्यावर एम्समध्ये उपचार करावेत असे आदेश दिल्ली न्यायालयाने गुरूवारी दिले. या साठी दाखल केलेल्या याचिकेत आपण पॉलीथेमियाचे उपचार सुरू असून त्यासाठी एम्सच्या डॉक्टरांकडे नियमित तपासणी गरजेची असल्याचे आझाद यांनी म्हटले होते. वेळेत उपचार न मिळाल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो,असे याविकेत नमूद केले होते. पोलिसांचा मनाई हुकूम मोडून का कायद्याविरोधातील निदर्शनात सहभागी झल्याबद्दल 21 डिसेंबर पासून अझाद न्यायलयीन कोठडीत आहेत.





