Bhigwan Case Update: मोठी बातमी..भिगवण प्रकरणातील तरुणीने कोर्टात बदलला जबाब; आईकडे जाण्याची इच्छा केली व्यक्त
Bhigwan Case Update : भिगवण येथील चर्चेत असलेल्या प्रेमप्रकरण आणि कथित अपहरण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

Bhigwan Case Update : राज्यभर चर्चेत असलेल्या भिगवण प्रकरणात (Bhigwan Case) नाट्यमय घडामोड घडली आहे. यापूर्वी तरुणासोबत राहण्यावर ठाम असलेली तरुणी आता कोर्टात जबाब बदलत आई आणि मामाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
ही तरुणी 17 फेब्रुवारी रोजी मुस्लिम तरुणासोबत घरातून निघून गेल्यानंतर वाद निर्माण झाला होता. 20 फेब्रुवारीला ती तरुणासह बारामती येथे पोलिसांसमोर हजर झाली होती. त्यावेळी तिने आपण स्वतःच्या इच्छेने गेल्याचे सांगत तरुणासोबत राहण्याची भूमिका घेतली होती.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी Bhigwan Case Update
या प्रकरणी आज इंदापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार पडली. न्यायालयाने संबंधित तरुणीला काही प्रश्न विचारले असता तिने आई आणि मामाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली.
पाच दिवस पुनर्वसन केंद्रात
बारामती न्यायालयासमोर हजर केल्यानंतर तरुणीला महिला पुनर्वसन केंद्रात पाच दिवस ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या कालावधीनंतर आज पुन्हा सुनावणी झाली. यावेळी तिने पूर्वीचा जबाब बदलत आईकडे जाण्याची तयारी दर्शवली.
या (Bhigwan Case) प्रकरणातील बदललेल्या भूमिकेमुळे पुढील कायदेशीर प्रक्रिया कोणत्या दिशेने जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिस आणि न्यायालयीन यंत्रणा पुढील निर्णय घेणार आहेत.





