‘आलिया-रणवीर’च्या Rocky Aur Rani Ki Prem Kahani मध्ये झळकणार भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंगचा आगामी चित्रपट “रॉकी आणि राणीची लव्हस्टोरी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, यामध्ये प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया कॅमिओ करणार आहेत. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना भारती सिंगने स्वतः याबद्दल खुलासा केला आहे.
भारती सिंग हे टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आहे. तिने अनेक टेलिव्हिजन शोमध्ये काम केले आहे. तिने आपल्या फनी कॉमेडीने लोकांची मने जिंकली आहेत. दरम्यान, या चित्रपटाबद्दल बोलताना भारती सिंगने खुलासा केला की, “ती करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहानीमध्ये तिचा पती हर्ष लिंबाचियासोबत कॅमिओ करणार आहे. एक दिवस मला करण जोहरच्या टीमकडून फोन आला की, रॉकी आणि राणीच्या लव्हस्टोरी चित्रपटात हर्ष आणि तिला एक सीन करायचा आहे.’ असं तिने सांगितलं.
दरम्यान, ‘रॉकी आणि राणीची लव्हस्टोरी’ हा एक कॉमेडी चित्रपट आहे. यामध्ये रणवीर सिंग रॉकी खातुरियाची भूमिका साकारत आहे. तर आलिया भट्ट राणी चॅटर्जीची भूमिका साकारत आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाची प्रदर्शनाची अधिकृत तारीख समोर आलेली नाही. त्यामुळे सिनेरसिकांना आणखी काही काळ या चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे.





