भारती सिंह आणि हर्ष लिंबाचियाने मुंबईत खरेदी केलं नवं ऑफिस

Bharti Singh And Haarsh Limbachiyaa| कॉमेडी क्वीन भारती सिंह सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. तिचा देशभरात मोठा फॅन फॉलोइंग आहे. तिच्या ट्यूब चॅनेलवरही ती नवे व्लॉग अपलोड करत त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. भारती सिंह आणि पती हर्ष लिंबाचिया कायम चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. यातच आता एका नव्या व्लॉगद्वारे त्यांनी मुंबईत नवी प्रॉपर्टी खरेदी केल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
भारतीने एका व्लॉगमध्ये नवीन ऑफिस विकत घेतल्याचं सांगितलं. हर्षसोबत ती तिचं नवीन ऑफिस बघायला पोहोचली होती. तिने शेअर केलेल्या व्लॉगमध्ये त्यांच्या नव्या ऑफिसची झलक पाहायला मिळते .भारतीच्या ऑफिसमध्ये अनेक खोल्या असून ते डुप्लेक्स आहे.
याव्यतिरिक्त, मेकअप आणि स्टाइलिंगसाठी एक विशेष खोली आहे. नवीन कार्यालयाच्या फेरफटका मारताना भारती विनोदी शैलीने हर्षला चेष्टेने धमकावले की, ‘मला आवडले नाही तर मी संपूर्ण ऑफिस फोडेन.’ दरम्यान, भारती आणि हर्ष नवीन इमारतीत त्यांचा व्यवसाय स्थलांतरित करण्यासाठी खूप उत्सुक आहेत. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत दोघांचं अभिनंदन केले आहे.
भारती सिंहने अनेक शोचं सूत्रसंचालन करत यशस्वीरित्या युट्यूब चॅनेल आणि पॉडकास्टही सांभाळत आहे. याशिवाय भारती हर्ष लिंबाचियासोबत अनेक टीव्ही शो होस्ट करताना दिसली आहे. दोघांनी हिंदी कलाविश्वात स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
हेही वाचा:





