मायणी, (प्रतिनिधी)- राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या भारतमाता विद्यालयाने २०२४ मध्ये पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवीच्या निकालामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपला यशस्वी ठसा कायम ठेवला आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ओंकार सूर्यवंशी, सुदर्शन पवार हे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. तर हर्षवर्धन यलमर, अथर्व पवार, आर्यन झोडगे, समर्थ पवार, सोहम शिंदे, आर्यन लुकडे, महेश कुमार चौधरी हे सात विद्यार्थी पात्र ठरले आहेत. पूर्व उच्चप्रथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अभयराज शिंदे जिल्ह्यात 28 वा, अनिश वडगावकर हे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. आर्यन शिंदे, अनंत जाधव, असद तांबोळी, मानस माने, प्रणित घाडगे, अर्णव लोहार, अर्पित कोळी, प्रितेश निकम, शिवराज देशमुख, प्रणित निकम, प्रथमेश भिसे, श्रीतेज टेंबरे, रुपेश भोंगाळे, समर्थ निकम, सोहम घाडगे, वैभव दगडे, श्रीशैल्य ढवळीकर, विराज जाधव, विश्वतेज महामुनी, वृषभ झोडगे, सोहम खिलारे, वेदांत लिपारे, वेदांत जावीर, वेदांत माळी हे २६ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांना बाळकृष्ण गुरव, धोंडीराम थोरात, सुभाष माळी, नाथा जाधव, श्रीरंग फाळके, प्रकाश जाधव, सीमा दिवटे, माधुरी जाधव, राहुल सावंत, उदय गुरव, अनिता पवार, मोहन पावरा, कैलास गावित, सूरज नदाफ यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे, सचिव सुधाकर कुबेर, सर्व संचालक, मुख्याध्यापक विजयकुमार पिसाळ, उपमुख्याध्यापक महेश तांबवेकर, पर्यवेक्षक बाळकृष्ण गुरव सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.