कोलकाता – भारतीय जनता पार्टीला रामराम करून तृणमूल कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले एक आमदार कृष्णा कल्याणी केंद्रीय तपास संस्थांच्या रडारवर आले आहेत. त्यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत. कल्याणी यांची कल्याणी सॉल्वेक्स प्रायव्हेट लि. ही कंपनी आहे. या कंपनीला ईडीने नोटीस बजावली आहे.
2021 मध्ये कल्याणी यांनी भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढवली. भाजपचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ममतांच्या तृणमूल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र त्यांनी विधानसभेचा राजीनामा दिलेला नाही.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव दिल्लीत; विरोधकांच्या आघाडीसाठी भेटीगाठी
आता त्यांच्याबाबतीत ममता बॅनर्जी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण पार्थ चॅटर्जी या ममता सरकारमधील मंत्र्याची शुक्रवारी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या निकटवर्तीय महिलेकडे 50 कोटी रोकड सापडल्यावर पक्षाने ही कारवाई केली आहे. ईडीच्या या कारवाया आपल्या पक्षात फूट पाडण्यासाठी केल्या जात असल्याचा आरोप ममतांनी केला आहे.
वाराणसीच्या “डीएम’चं ट्रान्सफर 24 तासात रद्द; जाणून घ्या मोदींना का आवडतो हा डीएम