नवी दिल्ली – गेल्या तीन दिवसांपासून तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे राजधानी दिल्लीत असून त्यांनी तेथे विरोधकांच्या आघाडीबाबत विविध पक्षांच्या नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे. शुक्रवारी त्यांनी या प्रक्रियेत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि राष्ट्रीय राजकारणावर चर्चा केली.
तासभर चाललेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांनी सद्य राजकीय स्थितीबाबत आणि राजकीय पक्षांच्या ऐक्याबाबत चर्चा केली. भारतीय जनता पक्षाला देश पातळीवर सक्षम पर्याय निर्माण करण्यासाठी व्यापक आघाडी उभारण्यासाठी चंद्रशेखर राव हे सध्या पुढाकार घेत आहेत.
डीएनए चाचणीचा निकाल बलात्कार प्रकरणात निर्णायक पुरावा नाही: मुंबई उच्च न्यायालय
या बैठकीला सपा नेते राम गोपाल यादवही उपस्थित होते. चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाच्या खासदारांच्याही अनेक बैठका घेतल्या आहेत.
Bloomberg Billionaires Index: भारताच्या “सावित्री जिंदाल’ ठरल्या आशियातील सर्वात श्रीमंत महिला