Bharat Taxi App : कॉसमॉस बँक-भारत टॅक्सी मध्ये सामंजस्य करार
कॉसमॉस बँक आणि भारत टॅक्सी यांच्यामध्ये (Bharat Taxi App) गुरूवारी सामंजस्य करार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

Bharat Taxi App : कॉसमॉस बँक आणि भारत टॅक्सी यांच्यामध्ये (Bharat Taxi App) गुरूवारी सामंजस्य करार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सचिन आपटे आणि नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे कर्नल हिमांशू यांनी करारावर स्वाक्षरी केल्या.
सदर कार्यक्रम (Bharat Taxi App) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर संपन्न झाला, यावेळी कॉसमॉस बँकेचे उपाध्यक्ष सीए डॉ. यशवंत कासार, बँकेचे ज्येष्ठ संचालक प्रविणकुमार गांधी तसेच महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
भारत टॅक्सी (Bharat Taxi App) हा देशातील पहिला राईड हेलिंग प्लॅटफॉर्म आहे. सहकार क्षेत्राला बळ देणारा, रोजगार उपलब्ध करून देणारा, सामाजिक सुरक्षितता देणारा भारत सरकारचा हा महत्वाचा उपक्रम आहे. भारत टॅक्सी ॲप करता सदर सामंजस्य करार करण्यात आला. ‘भारत टॅक्सी अंतर्गत ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, अशा व्यक्तींना फोर व्हीलर घेण्यासाठी कॉसमॉस बँक अर्थसहाय्य करणार आहे.
अशांकरिता एक कर्ज योजना बँकेने तयार केली असून या कार लोनसाठी स्पर्धात्मक व्याजदर बँकेतर्फे देण्यात आला आहे. सुरुवातीला ही कर्ज योजना बँकेच्या महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील शाखांमध्ये सुरू (Bharat Taxi App) करण्यात येत आहे. सदर दोन राज्यात मिळून बँकेच्या १६३ शाखा आहेत. भविष्यात ही योजना बँकेच्या शाखा असलेल्या इतर राज्यातूनही सुरू करण्याचा आमचा मानस आहे’, अशी माहिती कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सचिन आपटे यांनी यावेळी दिली.






