Cosmos Bank: देशातील आघाडीची सहकारी बँक असलेल्या कॉसमॉस बँकेने गुजरात राज्यात नवीन 10 शाखा सुरु करून आपल्या ग्राहक सेवेचा विस्तार केला. 25 मार्च रोजी गांधीनगर शाखेचे उद्घाटन इफ्कोचे अध्यक्ष दिलीपभाई संघानी, चंगोदर शाखेचे उद्घाटन न्यायाधीश जयेश भैरविया तसेच नवसारी शाखेचे उद्घाटन बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य मुकेश शहा यांच्या हस्ते करण्यात आले. 27 मार्च रोजी साऊथ बोपाल शाखेचे उद्घाटन कॉसमॉस बँकेचे संचालक अॅड. घनशाम अमिन, हिंमतनगर शाखेचे उद्घाटन नॅफकबचे संचालक व खोडीयार क्रेडिट को ऑपचे अध्यक्ष कांतीभाई पटेल, वेसू-सुरत शाखेचे उद्घाटन बँकेचे संचालक प्रवीणकुमार गांधी तसेच कटारगाम शाखेचे उद्घाटन नॅफकबचे संचालक व दि वर्चा को ऑप बँकेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष कांजीभाई भलाला यांच्या हस्ते करण्यात आले. 30 मार्च रोजी निकोल शाखेचे उद्घाटन नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक बी.के. सिंघल, सायन्स सिटी शाखेचे उद्घाटन गुजरात स्टेट को ऑप बँकेचे अध्यक्ष अजयभाई पटेल तसेच स्पिडवेल चौक राजकोट शाखेचे उद्घाटन उत्कर्ष इस्पातचे अध्यक्ष नीरज आर्या यांच्या हस्ते करण्यात आले. हेही वाचा – लग्नसराईच्या मागणीने सोने-चांदी दरात उसळी; जागतिक अनिश्चिततेत गुंतवणूकदार सावध गुजरात येथे 10 शाखा नव्याने सुरु करण्यात आल्यामुळे या राज्यात बँकेच्या 38 शाखा कार्यरत झाल्या असून एकूण शाखांची संख्या 193 झाली आहे. नव्याने सुरु झालेल्या शाखांमधून बँकेच्या सर्व अत्याधुनिक सेवा सुविधा तसेच लॉकर्स आणि ठेवींच्या आणि कर्जांच्या योजना उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. बँकेचा व्यवसाय रु. 42,000 कोटींपेक्षा अधिक झाला आहे. विविध शाखांच्या उद्घाटनप्रसंग संचालक अजित गिजरे व सचिन आपटे, उपस्थित होते. नजीकच्या काळात दक्षिण भारतात व पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शाखा विस्तार करण्याचे नियोजन असल्याचे सीए काळे यांनी सांगितले.