भारत फोर्ज – रोल्स रॉयस कराराचा विस्तार; पर्ल 700, पर्ल 10 एक्स इंजिन ब्लेड्स भारतातून पुरवठा

मुंबई – ब्रिटनमधील विमानाचे इंजिन तयार करणार्या रोल्स रॉयसी या कंपनीने भारत फोर्ज कंपनीबरोबरील सहकार्य कराराचे विस्तारीकरण केले आहे. आता भारत फोर्ज रोल्स रॉयसीच्या पर्ल 700 आणि पर्ल 10 एक्स या विमानाच्या इंजिनाच्या ब्लेड्स पुरविणार आहे.
या संदर्भातील करार बर्लीन येथे झाला. यामुळे भारत फोर्जने जागतिक पातळीवर आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे आणि या कंपनीचे अनेक भाग भारतामध्ये विकसित करण्याची शक्यता खुली केली आहे. रोल्स रॉयसी आपल्या सुट्या भागाची भारतातून खरेदी 2030 पर्यंत दुपटीने वाढणार आहे.
या करारामुळे कंपनीच्या या उद्दिष्टाला चालना मिळणार आहे. या अगोदर दोन्ही कंपन्यादरम्यान विमानाच्या इंजिनाचे ब्लेडस् पुरविण्याचा करार 2020 मध्ये झाला होता. त्यावेळी पर्ल 700 या इंजिनाचे भाग पुरविण्यात येत होते. आता त्यामध्ये पर 10 एक्सची भर पडली आहे. भारत फोर्ज कंपनीचे उपाध्यक्ष अमित कल्याणी यांनी सांगितले की, भारतामध्ये जागतिक दर्जाची उत्पादने तयार होऊ शकतात हे आम्ही सिद्ध केले आहे.





