भामा आसखेडग्रस्तांचे आंदोलन सुरू
Updated On:

शिंदे वासुली – भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन आणि उपोषणाला सुरुवात झाली आहे. करंजविहीरे (ता.खेड) येथील तळशेत वस्तीशेजारी धामणे फाट्यावर मुख्य रस्त्यालगत आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलक सत्यवान नवले, देवदास बांदल, गजानन कुडेकर, अण्णा देवाकडे, नवनाथ शिवेकर, संतोष कानडे, मंदार डांगले, नामदेव देशमुख उपस्थित आहेत.





