Bhagwant mann : महाराष्ट्रानंतर पंजाबमध्येही राजकीय भूकंप; थेट मुख्यमंत्री देणार राजीनामा? नेमकं काय घडलं….
या संपूर्ण प्रकरणामुळे पंजाबमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर दबाव वाढवला जात आहे.

Bhagwant mann : देशातील विविध राज्यांमध्ये पक्षफुटी आणि राजकीय घडामोडींमुळे वातावरण तापलेले असतानाच आता पंजाबच्या राजकारणातही मोठी खळबळ उडाली आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) नेते भगवंत मान यांच्याविरोधात काँग्रेसने जोरदार आक्रमक भूमिका घेतली असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे पंजाबमध्ये नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.
नेमकं प्रकरण काय? (Bhagwant mann)
मिळालेल्या माहितीनुसार, अकाल तख्तच्या एका कथित निर्णयाचा हवाला देत काँग्रेसने मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर निशाणा साधला आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार सुखजिंदर सिंह रंधावा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत भगवंत मान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
रंधावा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “श्री अकाल तख्त साहिबच्या निर्णयामुळे जगभरातील शीख समुदायामध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत भगवंत मान यांनी नैतिकतेच्या आधारावर पद सोडावे.”
यासोबतच त्यांनी आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनाही लक्ष्य करत, “भगवंत मान स्वतः राजीनामा देत नसतील तर केजरीवाल त्यांचा राजीनामा घेणार का?” असा सवाल उपस्थित केला.
काँग्रेसचा नेमका दावा काय? (Bhagwant mann)
काँग्रेसने सोशल मीडियावर एक व्हिडीओ क्लिप शेअर केली असून त्याच्या आधारे काही गंभीर आरोप केले आहेत. पक्षाच्या दाव्यानुसार, भगवंत मान यांनी शिख गुरूंच्या प्रतिमांबाबत आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप आहे.
याच पार्श्वभूमीवर अकाल तख्तने त्यांच्याविरोधात भूमिका घेतल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. या आरोपांबाबत भगवंत मान किंवा आम आदमी पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आली आहे का, तसेच अकाल तख्तची अधिकृत भूमिका काय आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकीय वातावरण तापलं
या संपूर्ण प्रकरणामुळे पंजाबमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर दबाव वाढवला जात असताना, आप पक्ष या आरोपांना कशा प्रकारे उत्तर देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, भगवंत मान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असली तरी त्यातून पुढे कोणते राजकीय परिणाम घडतात, तसेच या वादावर अकाल तख्त आणि आम आदमी पक्षाची अधिकृत भूमिका काय असते, याकडे पंजाबसह देशभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






