महिला दिन विशेष : भाद्रवी गडकरी… विक्रमी विमान फेरी

Updated On:
महिला दिन विशेष : भाद्रवी गडकरी… विक्रमी विमान फेरी

कल्याणी फडके/शिवानी पांढरे

पुणे – महिला वाहन चालवते असे म्हटले की अनेकांच्या मनात धडकी भरते. तर अनेकजण थट्टादेखील करतात. मात्र, आता महिलांनी विविध क्षेत्रांत प्रगती केली असून, वैमानिक होत “ती’ने विमानावरदेखील “कमांड’ मिळवली आहे. पुण्यातील महिला वैमानिक भाद्रवी गडकरी यांच्याशी महिला दिनानिमित्त दै. “प्रभात’ने संवाद साधला.

गडकरी या 2011 सालापासून हवाई क्षेत्रात कार्यरत असून, आतापर्यंत तब्बल 5 हजार 700 हून अधिक तास त्यांनी उड्डाण केले आहे. उड्डाणांदरम्यान आजही प्रवाशांकडून येणाऱ्या कौतुकांच्या प्रतिक्रियेबरोबरच महिला वैमानिक म्हणून प्रश्‍नार्थक प्रतिक्रियादेखील पाहायला मिळते. त्यामुळे महिला वैमानिकांना स्वीकारण्याची मानसिकता विकसित होण्याची गरज गडकरी यांनी यादरम्यान व्यक्‍त केली.

सातवीत असल्यापासून हवाई दलात जाण्याचे ठरवले होते. पदवीबरोबरच एनसीसीदेखील केले. यासाठीची मुलाखतदेखील पास झाले. मात्र, वैद्यकीय पात्रतेमध्ये “1 सेमी उंची कमी’ या कारणामुळे मी “रिजेक्‍ट’झाले. त्यानंतर व्यावसायिक हवाई क्षेत्राकडे वळाले. महिला वैमानिक म्हणून प्रवास सुखकर होता. उत्साहपूर्ण होता. पालकांसाठीदेखील हा प्रवास अभिमानास्पद होता.

सुट्ट्या आणि वेळांची निश्‍चिती नसते

सणांना आणि शनिवार-रविवारी सुट्टी नसते. सुट्ट्या आणि वेळांची निश्‍चिती नसते, अशी काही प्राथमिक आव्हाने आजही आहेत. मात्र विमान उड्डाण करताना प्रवासी कौतूक करतात तेव्हा छान वाटते. अनेक जण “मुलगी होती पायलट म्हणून भेटायचे होते’, “मराठी आहात म्हणून भेटायचे आहे’, असे म्हणत प्रवासी भेटतात. मात्र, दुसरीकडे महिला वैमानिक म्हणून काहीजण घाबरतात. एकदा उड्डाणादरम्यान “ये मॅडम उडायेगी प्लेन ?’ अशी शंका एकदा प्रवाशांनी केबिन क्रूकडे व्यक्‍त केली होती, असे गडकरी यांनी सांगितले.

पहिले विमान उड्डाण करताना अनेकजण भीती वाटली नाही का, असे विचारतात. मात्र, विमान उड्डाणाची उत्सुकता वेगळीच होती. आई-वडीलदेखील माझ्याबरोबर पहिला विमान प्रवास करण्यासाठी उत्सुक होते. केबिन क्रू आणि पालकांसाठी खूप खास होते. वडीलांच्या डोळ्यात पाणी आले होते, असे गडकरी प्रवास उलगडताना म्हणाल्या.

मुलींना ज्या क्षेत्रात कार्य करायचे आहे. त्यांनी ते क्षेत्र निवडून त्यांनी पुढे जात राहायला हवे. कुटुंबातील सर्वांनीदेखील मुलींना पाठींबा द्यायला हवा, असे गडकरीदेखील आवर्जुन नमूद केले.

 

आणखी संबंधित बातम्या

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

2026-10-08 07:24:45

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ

2026-10-08 07:21:14

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

2026-10-07 18:28:17

Mahajyoti : महाज्योती चाळणी परीक्षेत पुण्यातील आंबेगाव केंद्रावर प्रचंड गोंधळ; परीक्षा रद्द, उच्चस्तरीय चौकशीची मागणी