जिओचा धमाकेदार रिचार्ज प्लॅन, 12 ओटीटींचे सबस्क्रिप्शन एकदम मोफत; किंमत फक्त…

Best Jio Recharge Plans | सध्या एकापेक्षा एक जबरदस्त ओटीटी प्लॅटफॉर्म्स उपलब्ध झाले आहेत. मात्र, सर्वच ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे सबस्क्रिप्शन घेणे परवडत नाही. ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या सबस्क्रिप्शनसाठी तुम्हाला महिन्याला हजारो रुपये खर्च करावे लागू शकतात.
मात्र, तुम्ही जर जिओचे सिम कार्ड वापरत असल्यास, अवघ्या 500 रुपयांच्या रिचार्जमध्ये 12 ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे सबस्क्रिप्शन मोफत मिळेल. जिओच्या मोफत ओटीटी सबस्क्रिप्शन, डेटा, कॉलिंग सुविधेसह येणाऱ्या रिचार्ज प्लॅन्सविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
जिओचा 445 रुपयांचा प्लॅन
जिओच्या 445 रुपयांच्या प्लॅनची मुदत 28 दिवस आहे. यामध्ये तुम्हाला 28 दिवसांसाठी दररोज 2 जीबी डेटा, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 मोफत एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय, ठराविक ग्राहकांना 5जी डेटाचाही फायदा मिळतो.
या रिचार्जमध्ये तुम्हाला जवळपास 12 ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. रिचार्ज केल्यावर 28 दिवसांसाठी तुम्ही SonyLIV, ZEE5, Lionsgate Play, Discovery+, SunNXT, Kanchha Lannka, Planet Marathi, Chaupal, Hoichoi, FanCode आणि JioTV सह JioCloud चा मोफत लाभ घेऊ शकता.
जिओचा 175 रुपयांचा प्लॅन
जिओचा हा केवळ डेटा प्लॅन आहे. यामध्ये तुम्हाला 28 दिवसांसाठी एकूण 10 जीबी अतिरिक्त डेटाचा फायदा मिळतो. इतर बेस प्लॅनसह तुम्ही या रिचार्जचा लाभ घेऊ शकता. यासोबत तुम्हाला SonyLIV, ZEE5, Lionsgate Play, Discovery+, SunNXT, Kanchha Lannka, Planet Marathi, Chaupal, Hoichoi आणि JioTV चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.





