Best Mileage CNG Cars: 34KM पर्यंत मायलेज, किंमत 7 लाखांपेक्षा कमी; ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम CNG कार

Best CNG Cars With Highest Fuel Efficiency : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे वाहनचालक आता सीएनजी कार खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या तुलनेत सीएनजी कार अधिक मायलेज देतात. तुम्ही देखील नवीन सीएनजी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर भारतीय बाजारात अनेक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. जबरदस्त मायलेज देणाऱ्या अशाच टॉप- 5 कार विषयी जाणून घेऊया.
Maruti Swift CNG
मारुती स्विफ्ट भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. कंपनीने काही महिन्यांपूर्वीच या कारचे सीएनजी व्हेरिएंट भारतात लाँच केले आहे. या कारची सुरुवाती एक्स-शोरूम किंमत 8.19 लाख रुपये आहे. कारचे सीएनजी मॉडेल ग्राहकांना प्रति किलोग्रॅम 32.85 मायलेज देते.
Maruti Suzuki WagonR CNG
भारतीय ग्राहकांची मारुती सुझुकीच्या वॅगनआर या कारला देखील प्रचंड पसंती मिळते. कारचे सीएनजी मॉडेल प्रति किलोग्रॅम 33.47 किमी मायलेज देते. या कारला तुम्ही 6.45 लाख रुपये सुरुवाती किंमतीत (एक्स-शोरूम) खरेदी करू शकता.
Maruti Suzuki S-Presso CNG
Maruti Suzuki S-Presso चे सीएनजी मॉडेल देखील तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. भारतीय बाजारात ही कार फक्त 5.92 लाख रुपये एक्स-शोरूम किंमतीसह उपलब्ध आहे. मारुती-सुझुकी एस-प्रेसोचे सीएनजी मॉडेल हे प्रति किलोग्रॅम 33 किमी मायलेज देते.
Maruti Suzuki Alto K10 CNG
मारुती सुझुकीची ही कार भारतीय बाजारात 5.74 लाख रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत उपलब्ध आहे. कार 1 किलोग्रॅम सीएनजीमध्ये 33.85 किमी अंतर पूर्ण करू शकते. कमी किंमतीत चांगले माइलेज देणारी कार शोधत असाल तर Maruti Suzuki Alto K10 CNG नक्कीच विचार करू शकता.
Maruti Suzuki Celerio CNG
Maruti Suzuki Celerio च्या सीएनजी मॉडेलची भारतीय बाजारातील किंमत 6.74 लाख रुपयांपासून सुरू होते. कंपनीचा दावा आहे की, कार 1 किलोग्रॅम सीएनजीमध्ये 34 किमी मायलेज देते. तुम्ही जर 6 ते 7 लाखांच्या बजेट शानदार माइलेज देणारी कार शोधत असाल तर या गाड्यांचा नक्कीच विचार करू शकता.





