नेतान्याहू यांचे पाकच्या पावलावर पाऊल ; डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कारासाठी केले नामांकित

Benjamin Netanyahu on Donald Trump। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल रात्रीच्या जेवणाच्या वेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या पावलावर पाऊल टाकल्याचे पाहायला मिळाले. कारण त्यांनी यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकित केल्याचे म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबतच्या बैठकीत बेंजामिन नेतान्याहू यांनी याविषयी माहिती दिली आहे. त्यांनी याविषयी बोलताना,”मी नोबेल पारितोषिक समितीला पाठवलेले एक पत्र सादर करू इच्छितो. नेतान्याहू यांनी,” मी तुम्हाला नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित केले आहे. ” असे म्हटले. दरम्यान, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनीही ट्रम्प यांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकित करण्याबद्दल बोलले होते.
#WATCH | Israeli Prime Minister Benjamin Netanyahu nominates US President Donald Trump for the Nobel Peace Prize
PM Netanyahu says, “I want to present to you, Mr President, the letter I sent to the Nobel Prize Committee. It’s nominating you for the Peace Prize, which is well… pic.twitter.com/D9QdLfw1fQ
— ANI (@ANI) July 7, 2025
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याचा दावा केला होता. यानंतर ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराणमधील युद्धात उडी घेतली. ट्रम्प यांनी इस्रायलला पाठिंबा दिला आणि इराणवर हल्ला केला. मात्र, यानंतर युद्धबंदीवर एक करार झाला. ट्रम्प यांनी स्वतः नोबेल पुरस्कारावर आधीच प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणले होते कि,”मी खूप युद्धे थांबवली आहेत आणि आता मला नोबेल पारितोषिक मिळायला हवे, पण तसे होणार नाही”
ट्रम्प यांनी नेतन्याहू यांचे कौतुक केले Benjamin Netanyahu on Donald Trump।
डोनाल्ड ट्रम्प यांनी रात्रीच्या जेवणाच्या बैठकीत नेतन्याहू यांचे खूप कौतुक केले. यावेळी बोलताना, “बेंजामिन नेतन्याहू आणि त्यांची पत्नी सारा यांचे स्वागत करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. आम्ही बऱ्याच काळापासून मित्र आहोत आणि एकत्र यश मिळवले आहे.” असे त्यांनी म्हटले.
अमेरिका-इराण लवकरच चर्चा करणार Benjamin Netanyahu on Donald Trump।
ट्रम्प यांनीही इराण आणि अमेरिका यांच्यात लवकरच चर्चा होईल याची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, अमेरिकेने इराणची विनंती मान्य केली आहे. “आम्ही एक बैठक नियोजित केली आहे,” ट्रम्प म्हणाले. त्यांना (इराणला) बोलायचे आहे.” अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या अणुस्थळांवर हल्ला केला होता हे आम्ही तुम्हाला सांगतो. इराणनेही यावर प्रतिक्रिया दिली. त्याने इस्रायलचे मोठे नुकसान केले.





