बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी ४ जणांना अटक ; RCB मार्केटिंग प्रमुखाला विमानतळावरून घेतलं ताब्यात

Bengaluru Stampede। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने यांच्या आयपीएलचे जेतेपद पटकावल्यानंतर काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडली. यामध्ये ११ जणांचे प्राण गेले आहेत. आता या घटनेविषयी मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणी रॉयल चॅलेंजर्स बंगलुरूचे मार्केटिंग हेड निखिल सोसाळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. विजयी परेडपूर्वी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात पोलिसांनी केलेली ही पहिली अटक आहे. तर ३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. त्यानंतर ही कारवाई झाली.
विमानतळावरून घेतले ताब्यात Bengaluru Stampede।
समोर आलेल्या माहितीनुसार, निखिल सोसले मुंबईला पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. विमानतळावर पोहोचताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. बेंगळुरूमध्ये आरसीबीच्या विजयानंतर झालेल्या विजयी मिरवणुकीपूर्वी झालेल्या चेंगराचेंगरी आणि गोंधळात त्याची भूमिका काय आहे ?हे जाणून घेण्यासाठी निखिलची चौकशी केली जात आहे. या घटनेत ११ जणांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक जण जखमी झाले.
या प्रकरणात निखिल व्यतिरिक्त पोलिसांनी आणखी तीन जणांना ताब्यात घेतले आहे, त्यांचीही सखोल चौकशी सुरू आहे. सध्या, कार्यक्रम आयोजित करताना कोणत्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले, कोणाच्या परवानगीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि सुरक्षा मानकांचे पालन करण्यात आले की नाही हे शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. याला कोण जबाबदार आहे? या अटकेला या प्रकरणातील एक मोठी कारवाई मानले जात आहे आणि येत्या काळात त्यातून आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे. यापूर्वी, आरसीबीने चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या ११ समर्थकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती.
३ डीएनए कर्मचारी ताब्यात Bengaluru Stampede।
बेंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमजवळ नुकत्याच झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणात, ज्यामध्ये ११ लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले, क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी), डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क्स (जी या कार्यक्रमाची आयोजक कंपनी होती), कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) आणि इतर अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. डीएनए स्टाफमधील तीन सदस्य किरण, सुमंत आणि सुनील मॅथ्यू यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या त्यांची क्यूबन पार्क पोलिस ठाण्यात चौकशी सुरू आहे.
सिद्धरामय्या यांच्याकडून पोलिसांवर कारवाई
या प्रकरणात, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेंगळुरू चेंगराचेंगरीसाठी पोलिसांना जबाबदार धरले होते. त्यानंतर पोलिस आयुक्तांसह अनेक अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. नंतर, कर्नाटकचे आयपीएस अधिकारी सीमांत कुमार सिंग यांना बेंगळुरूचे नवीन पोलिस आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले.





