IND vs ENG : जैस्वालच्या डीआरएसमुळे खळबळ! बेन स्टोक्सने अंपायरशी घातला तुफान वाद, पाहा VIDEO

IND vs ENG 2nd Test DRS Controversy : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेती दुसरा सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. भारतीय संघाने या सामन्यावर आपली पकड मजबूत केली आहे. तिसऱ्या दिवसअखेर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला ४०७ धावांवर सर्वबाद करत १८० धावांची आघाडी मिळवली होती. त्यानंतर, दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने दुसऱ्या डावात १ बाद ६४ धावा केल्या होत्या. या दरम्यान यशस्वी जैस्वालने घेतलेल्या डीआरएसवरुन बेन स्टोक्स अंपायरशी वाद घालताना दिसला. नेमकं काय घडलं होतं? जाणून घेऊया.
भारताच्या दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवशी संघाला यशस्वी जैस्वालच्या रूपाने एकमेव धक्का बसला. दुसऱ्या डावात यशस्वी २२ चेंडूत २८ धावा करून बाद झाला. तो ज्या चेंडूवर बाद झाला, त्या चेंडूवर त्याने डीआरएस घेतला, ज्यामुळे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स नाराज झाल्याचे दिसले. यावेळी त्याने अंपायरशी वादही घातला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
बेन स्टोक्स अंपायरवर का संतापला?
Yashasvi Jaiswal appeared to go for the review after the DRS timer reached 0, and Ben Stokes was absolutely fuming about the issue!
📸: JioHotstar#BenStokes #YashasviJaiswal #KLRahul #ENGvIND #ENGvsIND #Cricket #SBM pic.twitter.com/MMGe5RELio
— SBM Cricket (@Sbettingmarkets) July 4, 2025
इंग्लंडच्या जोश टंगने डावातील आठवे षटत टाकले, ज्यामधील चौथ्या चेंडूवर यशस्वी जैस्वालच्या पॅडवर चेंडू लागला. यानंतर इंग्लंडने जोरदार अपील केली आणि अंपायरने जैस्वाल बाद ठरवले. मात्र, यशस्वीने नॉन-स्ट्रायकरच्या टोकावर उभ्या असलेल्या केएल राहुलशी चर्चा केली आणि डीआरएस घेतला. ज्यामुळे वाद पेटला. कारण नियमांनुसार, कोणत्याही संघाला डीआरएस घेण्यासाठी १५ सेकंदांचा अवधी असतो.
हेही वाचा – Hockey Asia Cup 2025 : पाक खेळाडूंना भारतात हॉकी खेळण्याची परवानगी का? आदित्य ठाकरेंचा केंद्रावर हल्लाबोल
काय होत वादाच कारण?
— BavumaTheKing Temba (@bavumathek83578) July 4, 2025
मात्र, यशस्वीला डीआरएस घेण्यास थोडा विलंब झाला. तरीही, अंपायरने वेळेकडे लक्ष न दिल्याने त्यांनी डीआरएस कॉल स्वीकारला. हे सर्व पाहून बेन स्टोक्स संतापला आणि थेट अंपायरकडे गेला, कारण अंपायरने वेळ संपल्यानंतरही डीआरएस स्वीकारला होता. त्यानंतर बेन स्टोक्स अंपायरशी वाद घालताना दिसला, पण अंपायरने त्याचे काहीच ऐकले नाही. डीआरएस घेतल्यानंतरही यशस्वी जैस्वाल आपली विकेट वाचवू शकला नाही आणि थर्ड अंपायरने त्याला एलबीडब्ल्यू आउट घोषित केले.
हेही वाचा – IND vs ENG : मोहम्मद सिराजचा कहर! इंग्लंडला गुंडाळत भारताला मिळवून दिली मोठी आघाडी
भारताकडे २४४ धावांची भक्कम आघाडी –
तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा पहिला डाव ४०७ धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडकडून जेमी स्मिथने सर्वाधिक १८४ धावांची खेळी केली, तर हॅरी ब्रूकने १५८ धावा केल्या. भारतीय गोलंदाजांमध्ये मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. मोहम्मद सिराजने १९.३ षटकांत ७० धावा देऊन सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या, तर आकाश दीपने २० षटकांत ८८ धावा देऊन ४ विकेट्स घेतल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने २४४ धावांची आघाडी मिळवली होती. सध्या केएल राहुल २८ आणि करुण नायर ७ धावांवर नाबाद आहेत.





