Ben Shelton Semifinals : क्रीडा विश्वात खळबळ! यूएस ओपनमध्ये सर्वात मोठा उलटफेर! बेन शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला लोळवलं
Ben Shelton Semifinals : सध्याचा टेनिस सुपरस्टार कार्लोस अल्काराझला वर्षातील शेवटच्या ग्रँड स्लॅम, २०२६ यूएस ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकन खेळाडू बेन शेल्टनकडून धक्कादायक पराभव पत्करावा लागला.

Ben Shelton Stuns Carlos Alcaraz US Open 2026 Quarterfinal Enters Semifinal : यूएस ओपन २०२६ (US Open 2026) स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत टेनिस जगताला हादरवून टाकणारा सर्वात मोठा उलटफेर पाहायला मिळाला. जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या अमेरिकेच्या बेन शेल्टनने (Ben Shelton) जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या आणि गतविजेत्या कार्लोस अल्काराझला ५ सेट्सच्या मॅरेथॉन लढतीत पराभूत करत उपांत्य फेरीत धडक मारली. या धक्कादायक पराभवासह अल्काराझचा ग्रँड स्लॅममधील सलग १८ सामन्यांच्या विजयरथाला अखेर ब्रेक लागला आहे.
पहिला सेट गमावूनही शेल्टनचा प्रतिहल्ला; ६-१ ने सेट जिंकून साधली बरोबरी! (Ben Shelton Semifinals)
आर्थर ॲश स्टेडियमवर तब्बल ४ तास २८ मिनिटे चाललेल्या या रोमहर्षक सामन्यात अल्काराझने पहिला सेट टायब्रेकरमध्ये ७-६ असा जिंकून १-० अशी आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर स्थानिक प्रेक्षकांच्या पाठिंब्यावर बेन शेल्टनने वादळी खेळ करत अल्काराझला निष्प्रभ केले. शेल्टनने दुसरा सेट अवघ्या काही मिनिटांत ६-१ असा एकतर्फी जिंकून सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्येही आपला दबदबा कायम राखत ६-३ ने विजय मिळवून सामन्यात २-१ अशी आघाडी घेतली.
Ben Shelton scores the biggest win of his career and a spot in the US Open semifinals! pic.twitter.com/2PCndRLcpL
— US Open Tennis (@usopen) September 9, 2026
अल्काराझचे चौथ्या सेटमध्ये पुनरागमन; निर्णायक पाचव्या सेटमध्ये श्वास रोखणारा थरार! (Ben Shelton Semifinals)
The defending champion is knocked out! 😱😮💨
Ben Shelton edges past Carlos Alcaraz to pull off a major upset and book his place in the semi-finals! 🔥
Well, talk about unpredictability at the US Open 2026! 👀
Watch #USOpen 2026 LIVE on Star Sports and JioHotstar! pic.twitter.com/13KTeCBTDW
— Star Sports (@StarSportsIndia) September 9, 2026
दोन सेट गमावून बॅकफूटवर पडलेल्या अल्काराझने चौथ्या सेटमध्ये चिवट खेळ दाखवला. त्याने एकतर्फी वर्चस्व गाजवत चौथा सेट ६-१ ने खिशात घालत सामना २-२ असा बरोबरीत आणला. त्यामुळे पाचवा आणि निर्णायक सेट अत्यंत अटीतटीचा ठरला. दोन्ही खेळाडूंनी एकमेकांची सर्व्हिस तोडण्यासाठी सर्वस्व पणाला लावले आणि हा सेटही टायब्रेकरमध्ये गेला. अखेर अत्यंत दबावाच्या क्षणी संयम राखत शेल्टनने टायब्रेकरमध्ये ७-६ ने बाजी मारत ऐतिहासिक विजय साकारला.
१८ सामन्यांची विजयी मालिका खंडित; विम्बल्डन २०२५ नंतर अल्काराझचा पहिला पराभव! (Ben Shelton Semifinals)
3:33am. Ben Shelton just beat the defending champion in the latest finish in US Open history. This is HIS moment. 🇺🇸🔥 #USOpen pic.twitter.com/xuThKcOjPy
— Mahlubi Stephen🇿🇦🇷🇺🇨🇳🇮🇷🇸🇩 (@Mahlubi_Stephen) September 9, 2026
कार्लोस अल्काराझला यापूर्वी २०२५ च्या विम्बल्डन फायनलमध्ये यानिक सिन्नरविरुद्ध ग्रँड स्लॅममध्ये पराभव पत्करावा लागला होता; त्यानंतर सलग १८ सामने जिंकत तो अपराजित राहिला होता. दुखापतीमुळे या वर्षी फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनला मुकल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या अल्काराझचे यूएस ओपनचे विजेतेपद राखण्याचे स्वप्न अखेर बेन शेल्टनच्या आक्रमक खेळासमोर धुळीस मिळाले.





