Belhe Yatra 2026 – जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील बेल्हे येथील ग्रामदैवत श्री कालभैरव नाथांची यात्रा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात झाली. यावेळी दोन दिवस चाललेल्या बैलगाडा घाटामध्ये एकूण 430 बैलगाडे धावले. बैलगाडे पहाण्यासाठी बैलगाडा शौकिनांनी मोठी गर्दी केली होती. दोन दिवस चाललेल्या यात्रेमध्ये हॉटेल, रसवंती, थंडपेये व इतरही अनेक दुकानांची मोठी रेलचेल होती व त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. यावेळी पहिल्या दिवसाची 12 सेकंदाची फळी बाळासाहेब गुंजाळ यांच्या बैलगाड्याने फोडली.13 सेकंदाची फळी बाबाजी डोंगरे यांच्या बैलगाड्याने फोडली. 14 सेकंदाची फळी स्वप्नाली चक्कर यांच्या बैलगाड्याने फोडली. 15 सेकंदाची फळी अतुल शिरतर यांच्या बैलगाड्याने फोडली.तसेच पहिल्या दिवशी घाटाचा राजा मंगेश डावखर, यशराज गुंजाळ, चंद्रकांत गुंजाळ व आरूष गुंजाळ यांच्या बैलगाड्याने मिळविला. तसेच दुसर्या दिवसाची 12 सेकंदाची फळी वैभव भोर यांच्या बैलगाड्याने फोडली. 13 सेकंदाची फळी निलेश गाडगे यांच्या बैलगाड्याने फोडली. 14 सेकंदाची फळी रामदास गुंजाळ यांच्या बैलगाड्याने फोडली. 15 सेकंदाची फळी जयदास गाडगे यांच्या बैलगाड्याने फोडली. तसेच दुस-या दिवशी घाटाचा राजा कार्तिकी शिरतर यांच्या बैलगाड्याने मिळविला. तर दोन दिवसांत सर्वात कमी सेकंदात कार्तिकी शिरतर यांचा बैलगाडा आला. फायनल घेतलेल्या शर्यतीत प्रथम क्रमांक यशराज गुंजाळ, अक्षय दिघे, यशराज लाळगे, निलेश भुजबळ, बाबाजी निघोट, सुभाष गलांडे, मयुर गाडेकर, विशाल बांगर, चंद्रकांत बोरचटे, जानकु डावखर, विष्णु पवार, राजु हाडवळे, चैतन्य पडवळ, रोहित गागरे, स्मिता कणसे यांच्या बैलगाड्याने नंबर मिळविले. श्री भैरवनाथ यात्रा कमिटी,सूर्या ग्रुप, उमाजी नाईक मित्रमंडळ, एकवीरा ग्रुप, बैलगाडा संघटनेच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. दरम्यान या बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी जुन्नर, पारनेर, संगमनेर, शिरूर, आंबेगाव व इतर तालुक्यातुनही मोठ्या संख्येने बैलगाडा शर्यत शौकिनांनी मोठी गर्दी केली होती.