Pune Accident | भरधाव ब्रीझाच्या धडकेत भिक्षेकरी महिला व दिड वर्षाच्या बालकाचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे,दि.8 – भरधाव ब्रीझा कारने रस्त्यावरील फिरस्ती महिला व दिड वर्षाच्या बालकास उडवले. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. तर महिलेची एक तीन वर्षाच्या मुलगी रस्त्याच्याकडेला थांबल्याने बालंबाल बचावली. तीला पोलिसांनी ससून येथी सफोश संस्थेंमध्ये दाखल केले आहे. महिलेची अद्याप ओळख पटू शकली नाही. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, आरोपी श्रेयस कुरणे(21,रा.महंमदवाडी) हा त्याच्या मैत्रिणीसह कानिफनाथ गडावर गेला होता. तेथून येथ असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास त्याने येवलेवाडी कमानिजवळ महिला व तीच्या दिड वर्षाच्या बालकास उडवले. अपघात घडल्यानंतर त्याने गाडीतून उतरुन दिड वर्षाच्या जखमी बालकास सोबत घेऊन भारती हॉस्पिटल गाठले. तेथे बालकास ऍडमिट करण्यात आले. मात्र याची खबर त्याने पोलिसांना दिली नव्हती. दरम्यान मुलाची आई जखमी अवस्थेत रस्त्याच्याकडेला पडल्याची खबर कोंढवा पोलिसांनी मिळाली. तीच्या शेजारी तीची तीन वर्षाची मुलगी आक्रोश करत होती.
कोंढवा पोलिसांनी महिलेला रुग्णालयात दाखल केले असता, तीला तपासनीअंती मृत घोषीत करण्यात आले. तीच्या अनाथ झालेल्या तीन वर्षाच्या मुलीला सफोश संस्थेत दाखल करण्यात आले आहे. तीचे कोणी नातेवाईक असल्यास कोंढवा पोलिसांनी संपर्क साधावा असे आवाहन तपास अधिकारी सहायक फौजदार पी.पी. डोईफोडे यांनी केले आहे.





