मतमोजणीपूर्वी ‘या’ तीन ठिकाणी भाजपचा विजय; महिलाराज असल्याचा निकाल समोर

Nagar Parishad – Nagar Panchayat Election Result 2025 | राज्यातील 264 नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबरला मतदान झालं होतं. 2 डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील 265 नगरपालिका, नगर परिषदांसाठी मतदान पार पडलं. तर 20 डिसेंबर रोजी उर्वरित 23 ठिकाणी मतदान पार पडलं. सकाळी 10 वाजल्यापासून नगरपंचायत आणि नगरपरिषद निकालाचे कल येण्यास सुरुवात होणार आहे. तर दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येण्याची शक्यता आहे.
अनेक उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे. पण त्याआधीच राज्यातील ३ ठिकाणाचे निकाल समोर आले आहेत. त्या तिन्ही ठिकाणी भाजपची सत्ता आल्याचे शिक्कामोर्तब झाला आहे. जळगावमधील जामनेर, सोलापूरमधील अनगर आणि धुळ्यातील दोंडाई या तिन्ही ठिकाणाचे निकाल समोर आले आहेत.
या ठिकाणाच्या नगरपंचायत- नगरपरिषदेत भाजपची सत्ता आली आहे. कारण, या नगरपरिषदा बिनविरोध झाल्या आहेत. जामनेर, दोंडाई आणि अनगर या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराशिवाय एकाही व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. आज सकाळी १० वाजता निवडणूक अधिकाऱ्याकडून अधिकृत माहिती दिली जाणार आहे.
भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी
जामनेरमध्ये साधना महाजन, दोंडाईमध्ये नयनकुंवर रावल आणि अनगरमध्ये प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. या तिन्ही नगराध्यक्ष या भाजपच्या आहेत. येथे आता महिला राज असेल. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगराध्यक्षपदी मंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयनकुंवर रावल आणि सर्व नगरसेवक बिनविरोध निवडून गेले आहेत. मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतमध्ये सर्व १७ प्रभाग आणि नगराध्यक्ष पदावर भाजपचे उमेदवार बिनविरोध विजयी झालेत.
दरम्यान, राज्यातील काही ठिकाणी निवडणुका चांगल्याच गाजल्या. कारण महायुतीतील तीनही पक्ष, भाजप, शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी हे एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याचे पाहायला मिळालं. त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. विशेष म्हणजे राज्यातील 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार असल्याने नगरपालिका निवडणुकीच्या निकालांकडे महापालिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणून पाहिले जात आहे.
हेही वाचा:
राज्यातील नगरपरिषदा, नगरपंचायतीवर ताबा कोणाचा? ; आजच्या निकालाने चित्र स्पष्ट होणार





