Nagar | श्रीरामपूर शहरात गोमांस पकडले ; 2 लाख 88 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- श्रीरामपूर शहरात काल सकाळी घरासमोरच्या वॉलकंपाउंडमधील मोकळ्या जागेत मुजाहिद रफिक कुरेशी, हारून अब्दुल कुरेशी हे दोघे गोवंश जनावरांचे मांस तोडत असताना पोलिसांना मिळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून ९४० कि. गोवंश जनावरांचे मांस, गोवंश जातीची जर्सी गाय तसेच काही साहित्यासह 2 लाख 88 हजारोचा मुद्देमाल हस्तगक केला आहे.
अप्पर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने शहरातील बाबरपुरा चौक, वॉर्ड नं. २ येथे छापा टाकला. तेथे जुनैद खलील कुरेशी याच्या घरासमोरच्या वॉलकंपाउंडमधील मोकळ्या जागेत मुजाहिद रफिक कुरेशी, हारून अब्दुल कुरेशी हे दोघे गोवंश जनावरांचे मांस सुरा, कुऱ्हाडीच्या सहाय्याने तोडत असताना मिळून आले.
पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे. पोकॉ. सतीश कटारे यांनी फिर्याद दिल्यावरून आरोपी मुजाहिद रफिक शेख,(वय ३०), हारून अब्दुल नबी कुरेशी(वय ४२, दोघे रा. कुरेशी मोहल्ला, वॉर्ड नं.२), जुनैद खलील कुरेशी (रा. बाबरपुरा चौक, वॉर्ड नं.२, श्रीरामपूर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.





