Hospital Negligence : महाराष्ट्रात खळबळ! सीझरनंतर पोटातच सोडले हातमोजे व कागद; बीड जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
Hospital Negligence : बीड येथील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय निष्काळजीपणाचा एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे.

Hospital Negligence : बीड जिल्हा रुग्णालयात धक्कादायक घटना समोर आली आहे. १९ वर्षीय संध्या सूरज गायकवाड या नवमातेची सीझर शस्त्रक्रिया झाल्यानंतर प्रकृती अचानक बिघडली. कुटुंबीयांच्या आरोपानुसार, शस्त्रक्रियेदरम्यान त्यांच्या पोटात सर्जिकल हातमोजे आणि कागद राहिल्याने त्यांना गंभीर त्रास झाला. सध्या संध्या यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Hospital Negligence)
संध्या गायकवाड यांच्यावर १ ऑगस्ट रोजी बीड जिल्हा रुग्णालयात सीझर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. चार दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. मात्र घरी गेल्यानंतर त्यांच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत असल्याने कुटुंबीयांनी त्यांना खासगी रुग्णालयात नेले. (Hospital Negligence)
तिथे सोनोग्राफीसह काही वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर त्यांच्या पोटात काहीतरी वस्तू असल्याचे निदर्शनास आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यानंतर संध्या यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Hospital Negligence)
ससून रुग्णालयात करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेदरम्यान संध्या यांच्या पोटातून सर्जिकल हातमोजे आणि कागद बाहेर काढण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रातही प्रश्न उपस्थित होत आहेत. (Hospital Negligence)
संध्या यांचे पती सूरज गायकवाड यांनी संबंधित डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पत्नीची ही अवस्था झाल्याचा आरोप केला आहे. बाळाला जन्म दिल्यानंतरही संध्या यांना आपल्या बाळाला कुशीत घेण्याइतकी ताकद नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. (Hospital Negligence)






