Beed Corona : बीड वासीयांसाठी दिलासादायक बातमी; जिल्ह्यात एकही करोना रुग्ण नाही
Updated On:

बीड – काही जिल्ह्यांमध्ये करोनाची तिसरी लाट पूर्णपणे ओसरली आहे. तब्बल दोन महिन्यानंतर बीड जिल्ह्यात सोमवारी (दि. २१) एकाचाही करोना अहवाल पोजोटीव्ह आला नाही. त्यामुळे आता जिल्हावासीयांसाठी ही दिलासादायक बाब मानली आहेत. बीडमध्ये सोमवारी करोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
२४८ नमुन्यांमध्ये सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले असून मागच्या दोन महिन्यानंतर आज पहिल्यांदा जिल्ह्यात एकही नवा रुग्ण आढळून आला नसल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. आता पर्यंत संपूर्ण बीड जिल्ह्यात तब्बल ११,६६,९१८ जणांची करोना तपासणी करण्यात आली असून, १,०८,३३८ जणांना करोना विषाणूची बाधा झाली. सध्या बीड जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९७.२९ टक्के इतका आहे.





