Teacher Scam : मोठी बातमी..! बोगस भरतीतील शिक्षकांना दणका; तब्बल 73 जणांनी नोकरी गमावली
Teacher Scam : बीड जिल्ह्यातील बहुचर्चित बोगस शिक्षक भरती प्रकरणात शिक्षण विभागाने मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे.

Teacher Scam : बीड जिल्ह्यात बोगस शिक्षक भरती प्रकरणात शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे. येथील प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या खासगी अनुदानित शाळांमधील 73 शिक्षकांची सेवा थेट समाप्त करण्यात आली आहे. त्यात प्राथमिक विभागातील 7 तर माध्यमिक विभागातील 66 शिक्षकांचा समावेश आहे. (Teacher Scam)
राज्यात 2012 पासून शिक्षक भरती बंद असतानाही या शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. न्यायालयांच्या सूचनांचा सोयीस्कर अर्थ लावून यांना नियुक्ती दिल्या गेल्या. काही ठिकाणी संच मान्यतेच्या दुरुस्तीच्या नावाखाली पदे वाढवण्यात आली. (Teacher Scam)
तर इतर ठिकाणी बनावट विद्यार्थ्यांच्या आधारे संच मान्यतेचे पद वाढवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यासाठी अन्य बनावट कागदपत्रे वापरले. त्यावरुन, शिक्षण विभागाने 73 शिक्षकांची सेवा समाप्त करत सर्वांना धक्का दिला आहे. याप्रकरणी आणखी 2217 बोगस पद निर्माण करुन भरती केलेल्या शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार असल्याची माहिती आहे. (Teacher Scam)
शिक्षक भरती प्रकरणात बीड येथील सामाजिक कार्यकर्ते सादेक इनामदार यांनी एसआयटीकडे तक्रार केली होती. त्यानंतर, ही कारवाई करण्यात आली असून, या कारवाईनंतर बीड शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. (Teacher Scam)
दरम्यान, यापूर्वीही जानेवारी 2023 मध्ये बीड जिल्ह्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र काढणाऱ्या 52 शिक्षकांच्या प्रमाणपत्राची चौकशी केल्यानंतर यामध्ये दोषी आढळलेल्या शिक्षकांवर बीडचे तत्कालीन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी तात्काळ निलंबनाची कारवाई केली होती. (Teacher Scam)
Teacher recruitment scam: माजी शिक्षणाधिकारी काटोलकर यांना अटक; 12 कोटींच्या भ्रष्टाचाराचा ठपका





