“माझी जात आडवी येते म्हणून…”; अजित पवार गटाच्या नेत्याकडून खदखद व्यक्त

Ajit Pawar | कृषीमंत्री माणिकराव कोकाटे वादग्रस्त वक्तव्यानंतर विधीमंडळात रमी खेळण्याच्या व्हिडीओमुळे अडचणीत आले आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. यानंतर आता कोकाटे यांच्याजागी या धनंजय मुंडेंना संधी दिली जाणार असल्याचीही चर्चा आहे.
यातच बीड जिल्ह्यातील माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके यांनीही मंत्रिपदासाठी उत्सुक असल्याचे संकेत दिले आहेत. मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते, अशा शब्दात प्रकाश सोळंके यांनी खंतही व्यक्त केली आहे.
सोळंके म्हणाले की, “बीड जिल्ह्यामध्ये सातत्याने मराठा समाज राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठीराखा राहिला आहे. गेल्या अनेक निवडणुकीत केवळ आणि केवळ मराठा समाजाने राष्ट्रवादीला खंबीर पाठींबा दिला. मात्र, मंत्रिपद देताना शरद पवारांपासून ते आता अजित पवारांपर्यंत प्रत्येकाने ओबीसीला संधी दिली. मराठा समाजाकडे ढुंकूनही बघितले नाही.’ Ajit Pawar |
बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी आणि मागासवर्गीयांना प्राधान्य
“फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा जपत सर्व समाजाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न पक्ष करत असतो. त्यात काही चुकीचे नाही. पण या पक्षाचा जो कणा आहे, ज्या समाजाने पक्षाला ताकद दिली, त्या समाजाला बीड जिल्ह्यात दुर्दैवाने गेली ४५ वर्ष पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपदापासून वंचित ठेवण्यात आले आहे. बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी आणि मागासवर्गीयांना प्राधान्य देण्याचे काम पक्षाने मागच्या काही वर्षांमध्ये केलं आहे. बीड जिल्हा ओबीसीसाठी राखीव दिला आहे का?” असा सवालही सोळंके यांनी यावेळी उपस्थित केला आहे. Ajit Pawar |
मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते
तुम्हाला मंत्रिपद का मिळत नाही? यावर बोलताना प्रकाश सोळंके म्हणाले की, “माझ्या नावाची चर्चा नेहमीच होत राहते. पण पक्षश्रेष्ठी काय विचार करतात, ते मला माहीत नाही.मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते असं मला वाटतं. मी ओबीसीमध्ये जन्माला आलो असतो तर संधी मिळाली असती. तसेच आमदार धनंजय मुंडेंना बीडचं पालकमंत्री करावं, किंवा राज्य पातळीवरील मोठ पद द्या, त्यांना संधी मिळत असेल तर माझ्या शुभेच्छा आहेत,” असंही सोळंके यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांनी घेतली दखल
दरम्यान, प्रकाश सोळंके यांच्या नाराजीची दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली असून मंगळवारी मुंबईत पक्षातील आमदारांची बैठक बोलावली आहे. त्यावेळी सोळंके यांच्याशी संवाद साधणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. . Ajit Pawar |
हेही वाचा:
अमेरिका-ईयूमध्ये व्यापार करार अंतिम ; डोनाल्ड ट्रम्प यांनी १५ टक्के कर लावण्याची केली घोषणा





