Kareena Kapoor : बेबोचा कॅज्युअल लूक! मुंबई एअरपोर्टवर झाली स्पॅाट; व्हिडिओ व्हायरल
Kareena Kapoor ; अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या आगामी दायरा चित्रपटामुळे चर्चेत असून, या दरम्यान ती मुंबई विमानतळावर स्पॅाट झाली.

Kareena Kapoor : बॅालिवूड इंडस्ट्रीत ‘बेबो’ या नावाने परिचित असणारी अनेकांची आवडती अभिनेत्री करीना कपूर खान ही नेहमी तिच्या हटक्या स्टाइलमुळे चर्चेत असते. नुकतीच ती मुंबई विमानतळावर स्पॅाट झाली. यावेळी पापाराझींनी तिला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.
करीना तिच्या आगामी “दायारा”(Daayra) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण जवळजवळ पूर्ण झाले असून, टीमकडून पोस्ट-प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. या दरम्यान, करीनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती मुंबई विमानतळावर कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे.
करीना कपूर खान ( Kareena Kapoor) मुंबई विमानतळावर पोहोचली त्यानंतर पापाराझींनी तिचे फोटो काढले. यावेळी तिने निळ्या रंगाची जीन्स आणि लाल स्वेटशर्ट असा कॅज्युअल लूक वेअर केला होता. या लूकमध्ये तिची अनोखी स्टाइल पुन्हा एकदा चाहत्यांना मोहित करून गेली. यावेळी करीनाने काळ्या रंगाचा चष्मा डोळ्यांवर घातला होता.
View this post on Instagram
या व्हिडिओवर चाहत्यांना कमेंट्स करत लूकची प्रशंसा केली आहे. एका चाहत्याने लिहिले, ‘बेबो इज द क्वीन’, दुसऱ्या चाहत्याने विचारले, ‘तुझा ‘दायारा’ चित्रपट कधी प्रदर्शित होत आहे?’
दायरा (daayra) चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे. हा एक क्राइम-ड्रामा थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात करीना कपूर खान आणि पृथ्वीराज सुकुमारन मुख्य झळकणार आहेत.
गुन्हेगारी, न्याय आणि समाजाच्या गुंतागुंतीचा शोध चित्रपटाच्या कथेतून घेतला जाणार आहे. अभिनेता पृथ्वीराज चित्रपटात एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे आणि करीना कपूर खान देखील दमदार भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा : Priyanka Deepika fans: प्रियंका चोप्राच्या एका ‘लाईक’मुळे वाद; दीपिका पादुकोणचे चाहते संतप्त






