Esha Deol: धर्मेंद्र यांच्या निधनानंतर ईशा देओल विमानतळावर उदास, पापाराझींना जोडले हात

Esha Deol : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर संपूर्ण देश दुःखात बुडाला होता. कुटुंबीयांवरही या दुःखाचा मोठा आघात झाला. धर्मेंद्र यांच्या कन्या आणि अभिनेत्री ईशा देओल या नुकत्याच मुंबई विमानतळावर दिसल्या. यावेळी त्या उदास आणि शांत दिसत होत्या. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई विमानतळावर ईशा देओल यांना पाहताच पापाराझींनी त्यांचे फोटो काढले. यावेळी त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, त्यांनी हात जोडून पापाराझींना नमस्कार केला आणि जाताना हात हलवून “बाय” असेही म्हटले. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतेही हसू नव्हते, मात्र पापाराझींशी त्यांचे वर्तन सौम्य आणि आदरयुक्त होते.
यावेळी पापाराझींनी ईशा यांना “कशा आहात?” असे विचारले, मात्र त्यांनी त्यावर उत्तर दिले नाही. विमानतळात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी पुन्हा एकदा मागे वळून सर्व पापाराझींना “बाय” केले. यावरून त्या कोणावरही नाराज नसल्याचे दिसून आले.
View this post on Instagram
ईशा देओल या वडील धर्मेंद्र यांच्या अत्यंत जवळच्या होत्या. त्यांच्या निधनानंतर त्यांनी सोशल मीडियावर वडिलांच्या आठवणी शेअर करत भावनिक पोस्टही केल्या होत्या. त्या पोस्टमधून वडिलांवरील प्रेम आणि दुःख स्पष्टपणे जाणवत होते.
दरम्यान, ईशा देओल सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत. मात्र, धर्मेंद्र यांचा शेवटचा चित्रपट ‘इक्कीस’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. श्रीराम राघवन दिग्दर्शित हा वॉर-ड्रामा चित्रपट १ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अगस्त्य नंदा आणि जयदीप अहलावत यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.





