नगर | घरात घुसून विवाहितेला मारहाण
Updated On:

नगर, (प्रतिनिधी) – घरात घुसून विवाहितेला मारहाण करून गैरवर्तन केल्याची घटना बुधवारी (दि. २१) रात्री पावणे नऊच्या सुमारास सिध्दार्थनगर परिसरात घडली. याप्रकरणी पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण दिनकर शिंदे, सिमा किरण शिंदे, वत्सला दिनकर शिंदे (सर्व रा. सिध्दार्थनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी बुधवारी रात्री त्यांच्या घरात एकट्या असताना तेथे किरण शिंदे आला. त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. छेड काढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.
तसेच सिमा शिंदे व वत्सला शिंदे यांनी देखील शिवीगाळ करून मारहाण केली. बहिण भांडण सोडविण्यासाठी आली असता तिला देखील मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.





