गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासवून श्वान प्रशिक्षकास मारहाण
Updated On:

पुणे : गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी असल्याचे सांगून श्वान प्रशिक्षकास तिघांनी जबर मारहाण केली. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश मोहन, जोनस रिचर्ड व माईकल भाई अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी भारत पंजाबी (40, रा. वानवडी) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यावरुन तिघांविरुद्ध तोतयागिरी करुन मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भारत पंजाबी यांचा श्वान प्रशिक्षणाचा व्यवसाय आहे





