nagar | चिचोंडी सोसायटीच्या व्हा.चेअरमनपदी अलका वाडेकर

नारायणडोहो, ( प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील चिचोंडी सेवा सोसायटीचे व्हा.चेअरमन सुरेश ठोंबरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर अलका अर्जुन वाडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सेवा सोसायटीच्या इतिहासात प्रथमच एका महिलेला व्हा.चेअरमनपदी काम करण्याची संधी मिळाली आहे.
या निवडीबद्दल युवा नेते इंजि.प्रविण कोकाटे, सरपंच शरद पवार, शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे, मा.सरपंच मच्छिंद्र खडके, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे, मा.सरपंच शंकरराव पवार, कामधेनु पतसंस्था चेअरमन डॉ.ययाती फिसके यांचेहस्ते त्यांच्या सन्मान करण्यात आला यावेळी चेअरमन महादेव खडके, डॉ.मारुती ससे, सुरेश ठोंबरे,
दिलीप पवार, पंडितराव कोकाटे, काशीनाथ वाडेकर, संदीप कोकाटे,चंद्रकांत सदाफुले, महेश जगताप पा., अंबादास फिसके सर, विठ्ठल (देवा)कोकाटे, काशिनाथ बेल्हेकर, भाऊसाहेब ठोंबरे, बबन कोकाटे, कासम सय्यद, अर्जुन वाडेकर, महादेव कोकाटे, नानासाहेब कोकाटे, सचिव दत्तात्रय झांबरे, बाबासाहेब वाडेकर, पठाण गुरुजी, प्रशांत लबडे, संतोष कोकाटे, जगन्नाथ ठोंबरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.





