Covid 19 : चिंताजनक! काळजी घ्या.. राज्यात करोना रुग्णवाढीचा दर वाढला

मुंबई – राज्यात पुन्हा एकदा करोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. करोना चाचण्या करणा-यांपैकी बाधा झालेल्या रुग्णांचे प्रमाणही काही महिन्यांच्या तुलनेत तीन टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या काही महिन्यांत करोना चाचण्यांपैकी बाधित अहवाल येण्याचा दर 0.53 टक्के होता. तोच दर मागील आठवड्यामध्ये 3.51 टक्क्यांवर पोहोचला आहे.
राज्यात इन्फ्ल्यूएंझा तसेच इतर संसर्गजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना मागील काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येतही हळूहळू वाढ होताना दिसत आहे. करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारकडून करोना चाचण्या करण्यावर भर देण्यात येत आहे.
DigiLocker : ड्राइव्हिंग लायसन्स ऑनलाईन कसं डाऊनलोड कराल; जाणून घ्या….फक्त 3 Steps मध्ये…
राज्यात सर्वाधिक बधितांचे प्रमाण नंदुरबार जिल्ह्यात आहे. नंदुरबारमध्ये करोना चाचण्यांपैकी बाधितांचे प्रमाण 20 टक्के आहे. त्याखालोखाल पुणे 9.2 टक्के, औरंगाबाद 9 टक्के, कोल्हापूर 8.7 टक्के, नगर 8.4 टक्के, सांगली 7.8 टक्के आहे. त्यामुळे या जिल्ह्यांत अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.





