काळजी घ्या! एका दिवसात ‘इतक्या’ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; आरोग्य प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन

Number of Corona patients in Maharashtra : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना पाहायला मिळत आहे. काल मंगळवारी १० जानेवारी या एकाच दिवशी ८९ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता बाधितांची संख्या ही १ हजार ५९३ वर जाऊन पोहचली आहे. यामध्ये महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या ७१९ इतकी झाली आहे.
राज्यात जानेवारी 2025 पासून एकूण १८ हजार १०३ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १ हजार ५९३ जण बाधित आढळले आहेत. आतापर्यंत ९५९ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या ६१५ रुग्ण सक्रिय आहेत. या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 60.20% टक्के इतका आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. ज्येष्ठ नागरिक किंवा ज्यांना आजार आहेत, त्यांनी याबाबत विशेष काळजी घ्यावी, असे आरोग्य प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी घाबरून जाऊ नये, सतर्कता बाळगावी, असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे.
कुठे किती आहेत रुग्ण?
पुणे महानगरपालिका 23
ठाणे महापालिका ३
नवी मुंबई महापालिका १
कल्याण महापालिका ४
मीरा भाईंदर महापालिका १
रायगड १
पीसीएमसी ९
सातारा ३
सांगली १
छत्रपती संभाजीनगर ४
गोंदिया १
चंद्रपूर २
नागपूर महापालिका ३
हेही वाचा: पुन्हा पुढे ढकलली शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम ; समोर आले ‘हे’ मोठे कारण





