BCCI Naman Awards : नमन सोहळ्यात चॅम्पियन्सचा मेळा! भारताच्या पाच विश्वविजेत्या संघांचा गौरव; द्रविडलाही मिळाला सर्वोच्च सन्मान
BCCI Naman Awards : विविध वयोगटांत आणि श्रेणींमध्ये भारताने सलग पाच आयसीसी (ICC) जेतेपदे पटकावून जगावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

BCCI Naman Awards 2026 World Cup Winners : भारतीय क्रिकेटसाठी मागील काही वर्षे स्वप्नवत ठरली आहेत. विविध वयोगटांत आणि श्रेणींमध्ये भारताने सलग पाच आयसीसी (ICC) जेतेपदे पटकावून जगावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या ऐतिहासिक यशाचा जल्लोष करण्यासाठी बीसीसीआयने ‘नमन अवॉर्ड्स’मध्ये पाचही विश्वविजेत्या संघांना विशेष मेमेंटो देऊन सन्मानित केले.
युवा शक्तीचा गौरव –
A moment of immense pride 🌟
🎥 The Men’s #U19WorldCup winning squad are felicitated by IPL Chairman Mr. Arun Singh Dhumal at the #NamanAwards 2026 ✨@ThakurArunS pic.twitter.com/yZvLSxMx7F
— BCCI (@BCCI) March 15, 2026
भारताच्या भविष्यातील ताकदीची झलक या सोहळ्यात पाहायला मिळाली. निक्की प्रसादच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषक २०२५ जिंकणाऱ्या संघाचा आणि आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील पुरुष विश्वचषक २०२६ जिंकणाऱ्या संघाचा यावेळी गौरव करण्यात आला. या दोन्ही युवा संघांनी दक्षिण आफ्रिकेला नमवून तिरंगा फडकवला होता.
Honouring a fantastic achievement 🙌
🎥 A special felicitation for the ICC Champions Trophy 2025 winning #TeamIndia at the hands of BCCI President Mr. @MithunManhas and BCCI Hon. Secretary Mr. @lonsaikia 🏆#NamanAwards pic.twitter.com/ADb4rEiX9S
— BCCI (@BCCI) March 15, 2026
सीनियर संघांचा ऐतिहासिक पराक्रम –
Meet the reigning T20 World Champions 🏆
🎥 The ICC Men’s T20 World Cup 2026 winners are felicitated by BCCI President Mr. @MithunManhas and BCCI Hon. Secretary Mr. @lonsaikia 👏#NamanAwards pic.twitter.com/c5xCCHdx41
— BCCI (@BCCI) March 15, 2026
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकणारा पुरुष संघ आणि हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली प्रथमच महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ जिंकणारा संघ या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले. तसेच, नुकताच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडला पराभूत करून पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ जिंकणाऱ्या संघाचाही गौरव करण्यात आला. एकाच वेळी ५ विश्वचषक ट्रॉफी व्यासपीठावर असणे, हा भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वात अभिमानास्पद क्षण ठरला.
दिग्गजांचा सन्मान –
A historic triumph honoured 🏆
A prestigious felicitation of the ICC Women’s Cricket World Cup 2025 winners by BCCI Vice President Mr. @ShuklaRajiv and BCCI Hon. Joint Secretary Mr. @prabhtejb ✨#NamanAwards pic.twitter.com/OaGASjJKeW
— BCCI (@BCCI) March 15, 2026
विश्वविजेत्या संघांसोबतच भारतीय क्रिकेटच्या तीन महान खेळाडूंना ‘कर्नल सी. के. नायडू लाईफटाइम अचीव्हमेंट’ पुरस्काराने गौरवण्यात आले. यामध्ये राहुल द्रविड, मिताली राज आणि रॉजर बिन्नी यांचा समावेश आहे. तसेच, शुबमन गिल आणि स्मृती मानधना यांना २०२४-२५ हंगामातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा बहुमान मिळाला.





