WPL 2024 : महिला आयपीएल स्पर्धेतील सर्व सामने गुजरातमध्ये होणार;BCCI ने दिले संकेत…

मुंबई – महिलांच्या आयपीएल स्पर्धेतील पुढील वर्षीचे सर्व सामने गुजरातमध्ये होतील असे संकेत बीसीसीआयने दिले आहेत. गेल्या मोसमातील सर्व लढती मुंबईत झाल्या होत्या. गुजरातसह बंगळुरु व उत्तर प्रदेशमध्येही सामने आयोजित करण्याबाबत सध्या चर्चा सुरु आहे.
मात्र, खेळाडूंना वारंवार प्रवास करावा लागू नये तसेच त्यांना सरावासाठीही पुरेसा वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेतला जाणार आहे. या स्पर्धेसाठी गुजरातच निश्चित होइल असेही संकेत मिळत आहेत.
BCCI : पिंकबॉल टेस्टला भारताचा नकार; जय शाह यांनी सांगितले कारण…
याचे मुख्य कारण म्हणजे तेथे अहमदाबाद व राजकोट ही दोन मैदाने आहेतच शिवाय बडोद्यात एक नवे स्टेडियमही लवकरच तयार होत आहे. त्यामुळे ही एकच स्पर्धा या तीन मैदानांवर खेळवणे सगळ्यांच्याच सोइचे होणार आहे. या बाबत आयपीएल समितीची लवकरच बैठक होणार असून त्यात अधिकृत घोषणाही केली जाइल.





