Indian ODI Squad For South Africa Tour : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. एकदिवसीय संघाची कमान केएल राहुलकडे सोपवण्यात आली आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली संघात नाहीत. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात रविवार, 10 डिसेंबरपासून तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेने होणार आहे. यानंतर रविवार, 17 डिसेंबरपासून 3 सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयने युवा संघावर विश्वास व्यक्त केला आहे, ज्यामध्ये रजत पाटीदार, रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, टिळक वर्मा आणि रिंकू सिंग या फलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. साई सुदर्शन आणि रजत पाटीदार यांनी अद्याप आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले नाही. अशा परिस्थितीत केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाच्या माध्यमातून हे दोन्ही फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप पाडू शकतात. यावेळी काही काळ दुर्लक्षित असलेला यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनलाही संधी देण्यात आली आहे.
भारतीय संघाचे दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक….
टी-20 मालिका….
पहिला सामना – 10 डिसेंबर, डर्बन
दुसरा सामना – 12 डिसेंबर, केबेर्हा
तिसरा सामना – 14 डिसेंबर, जोहान्सबर्गएकदिवसीय मालिका…
पहिला सामना – 17 डिसेंबर, जोहान्सबर्ग
दुसरा सामना – 19 डिसेंबर, केबेर्हा
तिसरा सामना – 21 डिसेंबर, पार्लकसोटी मालिका…
पहिला सामना – 26 ते 30 डिसेंबर, सेंच्युरीयन
दुसरा सामना – 3 ते 7 जानेवारी, केपटाऊन
याशिवाय संघात फक्त युवा गोलंदाजांना सुध्दा संधी देण्यात आली आहे. मात्र, अनुभवी फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहलचे प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन झाले आहे. याशिवाय 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक संघाचा भाग असलेला चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीपचाही संघात समावेश आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि दीपक चहरसह चार गोलंदाज आहेत.
India’s squad for 3 ODIs: Ruturaj Gaikwad, Sai Sudharsan, Tilak Varma, Rajat Patidar, Rinku Singh, Shreyas Iyer, KL Rahul (C)(wk), Sanju Samson (wk), Axar Patel, Washington Sundar, Kuldeep Yadav, Yuzvendra Chahal, Mukesh Kumar, Avesh Khan, Arshdeep Singh, Deepak Chahar.#SAvIND
— BCCI (@BCCI) November 30, 2023
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ…
केएल राहुल (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, टिळक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, अविनाश कुमार, अर्शदीप सिंग, दीपक चहर.